नैराश्येतून इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:05 IST2021-07-03T04:05:06+5:302021-07-03T04:05:06+5:30

पोलिसांनी सांगितले की, सिडको एम-२ येथील रहिवासी भाकरवाल चिकलठाणा एमआयडीसीमधील एका कंपनीत कामाला होते; मात्र काही दिवसांपूर्वी ...

Suicide by strangulation of Isma out of depression | नैराश्येतून इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

नैराश्येतून इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसांनी सांगितले की, सिडको एम-२ येथील रहिवासी भाकरवाल चिकलठाणा एमआयडीसीमधील एका कंपनीत कामाला होते; मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना कंपनीने कामावरून काढून टाकल्यानंतर ते घरीच होते. नोकरी नसल्यामुळे ते नैराश्येत होते. ते फारसे कुणाला बोलत नव्हते. गुरुवारी दुपारी त्यांनी नातेवाइकांसह जेवण केले. सायंकाळी ते, त्यांची पत्नी समोरच्या खोलीत बसलेली असताना ते आतील खोलीत गेले आणि त्यांनी गळफास घेतला. बराच वेळ झाला तरी ते खोलीतून बाहेर आले नाही, शिवाय त्यांनी खोलीचे दार आतून लावून घेतले होते. रात्री ९ वाजताच्या सुमारास पत्नीने खोलीचे दार ठोठावले; मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांनी खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसले. या घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस हवालदार शेषराव ईलग तपास करीत आहेत.

Web Title: Suicide by strangulation of Isma out of depression