नवीन पद्धतीने चिमणापूर शिवारात ऊस लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:06 IST2020-12-24T04:06:26+5:302020-12-24T04:06:26+5:30
खरिपातील कपाशी, मका पिकांचे मोठे नुकसान झाले. हाताशी आलेले पीक गेल्याने शेतकरी त्रस्त झाला. शासनाने पंचनामे करून किरकोळ स्वरूपात ...

नवीन पद्धतीने चिमणापूर शिवारात ऊस लागवड
खरिपातील कपाशी, मका पिकांचे मोठे नुकसान झाले. हाताशी आलेले पीक गेल्याने शेतकरी त्रस्त झाला. शासनाने पंचनामे करून किरकोळ स्वरूपात मदत केली. यंदा अद्रकीचे देखील नुकसान झालेले आहे. त्यामुळे कोणते पीक घ्यावे, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अशा परिस्थितीत देखील चिमणापूर येथील प्रगतिशील शेतकऱ्यांनी हार मानली नाही. शेतकरी अवचितराव सोळुंके यांनी फुलशेती आणि मिरची लागवड करून यशस्वी उत्पादन केले.
आता ऊस लागवडीकडे वळले शेतकरी
कन्नड येथील बारामती ॲग्रो युनिट-२ कारखाना सुरू झाल्याने या शिवारातील नागरिकांनी पुन्हा ऊस लागवड करण्याकडे कल वाढविला आहे. त्यात ऊस लागवड करताना कोल्हापूर व बारामती पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. शेतकर सोळुंके म्हणाले की, कोल्हापूर येथून कटर आणून उसाचा एक इंच आकाराचा डोळा कट करण्यात आला. त्याची लागवड सव्वाएकर शेतात केली आहे. या नवीन ऊस लागवड पद्धतीची कन्नड कारखान्याचे ऊस विकास अधिकारी बहिरकर यांनी पाहणी केली आहे.
...........................फोटो :