शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
10
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
11
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
12
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
13
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
14
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
15
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
16
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
17
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
18
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

दहा सीईओंनी जाणून घेतल्या महिला बचत गटांच्या यशोगाथा

By admin | Updated: June 22, 2014 00:11 IST

जालना : राज्यातील दहा जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज भेटी देवून गट व ग्रामसंघ यांच्या कामकाजाची पद्धती जाणून घेतली.

जालना : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पथदर्शी स्वरूपात चालणाऱ्या जालना जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता गटांच्या कामकाजाला राज्यातील दहा जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज भेटी देवून गट व ग्रामसंघ यांच्या कामकाजाची पद्धती जाणून घेतली.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सीईओ श्रावण हार्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ पे्ररणा देशभ्रतार, रत्नागिरीचे सीईओ शेखर गायकवाड, सोलापूरचे सीईओ चंद्रकांत गुडेवार, नंदूरबारचे सीईओ व्ही.गमे यांच्या चमूने हिस्वन खुर्द येथील जय मल्हार व साईराम महिला स्वंयसहाय्यता गटातील महिला सदस्यांच्या बैठकीला भेट देऊन गटाच्या कामकाजाची पध्दती जाणून घेतली. गटाच्या माध्यमातून गरिबीवर कशी मात करता येते, यासंबंधी महिलांनी विचार व्यक्त केले. सीईओ पथकातील सदस्यांनी महिलांच्या वैयक्तिक प्रगतीविषयी चर्चा केली. याचसोबतच भाटेपुरी येथील सावित्रीबाई महिला ग्रामसंघ येथेसुध्दा पथकाने भेट दिली. ग्रामसंघाने केलेल्या सामाजिक कार्याची माहिती घेतली. अभियानाच्या मुख्य परिचालन अधिकारी लीना बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळचे सीईओ मल्लीनाथ कामशेट्टी, गडचिरोलीच्या सीईओ संपदा मेहता, गोंदियाच्या सीईओ डी.डी. शिंदे, वर्ध्याचे सीईओ उदय चौधरी, दादासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते येथील रामरहिम, भारतमाता, एकता चमेली या महिला स्वयंसहाय्यता गटांना भेटी दिल्या. यावेळी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न व खर्च, सूक्ष्म ऋण आराखडा याविषयी चर्चा करून समाधान व्यक्त केले. याचबरोबर राजुरेश्वर महिला ग्रामसंघ, राजूर येथे भेट देऊन ग्रामसंघाच्या कामकाजाची पध्दती, पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, ग्रामसंघाची भूमिका आदी बाबी जाणून घेतल्या. सीईओ पे्ररणा देशभ्रतार यांच्या मार्गदर्शनाखाली जालना व भोकरदन तालुक्यातील गटविकास अधिकारी जिल्हा व तालुका अभियान कक्षाचे कर्मचारी, विस्तार अधिकारी आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)