उत्खननाबाबत अहवाल सादर
By Admin | Updated: July 20, 2014 00:31 IST2014-07-20T00:28:03+5:302014-07-20T00:31:44+5:30
उस्मानाबाद : उपसंचालक भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय यांच्या पथकाने जून महिन्यात जिल्ह्यातील दगड खदानींची मोजणी व तपासणी केली

उत्खननाबाबत अहवाल सादर
उस्मानाबाद : उपसंचालक भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय यांच्या पथकाने जून महिन्यात जिल्ह्यातील दगड खदानींची मोजणी व तपासणी केली असता यात अनेक खाणपट्टीचालकांनी क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना नुकतेच दिले आहेत.
याबत मिळालेली माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्यातील ८७ खाणपट्टीचालकांनी केलेल्या उत्खननाबाबतची पाहणी पथकामार्फत करण्यात आली होती. यानंतर या पाहणीचा अहवाल पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला आहे. या अहवालानुसार अनेक खानपट्टीचालकांनी गौण खनिज स्वामित्वधन भरणा केल्यापेक्षाही अधिक प्रमाणात गौण खनिज उत्खनन केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यावरून खानपट्टीचालकांनी गौण खनिजाचे केलेले उत्खन्न व संबधित कालावधीत भरलेले गौण खनिज स्वामित्वधन याची पडताळणी करुन उर्वरित गौण खनिज उत्खन्न अवैध समजून नियमानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. तसेच याव्यतिरिक्त मोजणी करावयाच्या खदानी शिल्लक राहिल्यास त्यांची यादी तात्काळ कार्यालयास सादर करण्याबाबतही अप्पर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)