बोलक्या फरशीवर विद्यार्थी रमले अभ्यासात
By Admin | Updated: March 20, 2016 23:46 IST2016-03-20T23:41:16+5:302016-03-20T23:46:10+5:30
विठ्ठल फुलारी, भोकर ज्ञानरचनावादाचा व्यवस्थित उपयोग करून घेत शाळेतील फरशी बोलकी झाली़ अनेक रंगबेरंगी शैक्षणिक साहित्य तयार झाले़

बोलक्या फरशीवर विद्यार्थी रमले अभ्यासात
विठ्ठल फुलारी, भोकर
ज्ञानरचनावादाचा व्यवस्थित उपयोग करून घेत शाळेतील फरशी बोलकी झाली़ अनेक रंगबेरंगी शैक्षणिक साहित्य तयार झाले़ स्वत:च्या खर्चातून शाळेला नवे रूप आणण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून मुख्याध्यापक व शिक्षिकांनी परिश्रम घेतले़ आता याचे फळ मिळायला सुरुवात झाली़ विद्यार्थी अभ्यासात रममान होवू लागले़ ही किमया साधली भोकर येथील समतानगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने
भौतिक सुविधांपासून काही प्रमाणात वंचित असलेली ही शाळा़ शाळेला संरक्षक भिंत नाही़ वर्ग चार असले तरी वर्गखोल्या मात्र तीनच़ विद्यार्थीही गरीब कुटुंबातून आलेले़ यामुळे लोकवाटा मात्र शून्य़ यात ाअणखी अडचण म्हणजे ७५ टक्के विद्यार्थी द्विभाषिक़ कोणी बंजारा तर कोणी तेलगु, हिंदी बोलणाऱ यामुळे शिकवताना अनंत अडचणी निर्माण होत होत्या़ पण आता या शाळेतील मुख्याध्यापक डी़डी़छत्रे, सहशिक्षिका एस़एऩ बुडकेवार, ए़एच़जमदाडे, प्रीती नांदेडे यांनी ज्ञानरचनावादप्रमाणे शाळेला वेगळे रूप दिले़
स्वखर्चातून शिक्षकांनी शाळेच्या फरशीवर अभ्यासक्रम उतरविला़ अनेक रंगाचा उपयोग करून फरशीवरचे रेखाटन अप्रतिम केले़ स्वरांच्या बाराखडीचे फूल, रंगीत खडे, मनी, अंक जिना, बाराखडीचे झाड, अंकांची व अक्षराची अळी, अक्षरपाटी, संख्येचा लहान-मोठेपणा, फरशीवरील स्वत:ची ओळख, रिंग मास्टर, संख्यांचा आकाशकंदिल, संख्यांची आगगाडी, अंकशिडीचा खेळ अशा अनेक सुंदर शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लावली़ यामुळे द्विभाषिक असलेले विद्यार्थी आता अभ्यासात रमू लागले आहेत़ जोडशब्दापासून वाचनापर्यंत आणि गणितीक्रियामध्येही मुले प्रगती करीत आहेत़
कोणतीही बाह्य शिकवणी नसलेले हे चिमुकले आता अभ्यासात मग्न झाले आहेत़ गुणवत्ता वाढत आहे़ विद्यार्थी प्रगत होत आहेत़ विशेष म्हणजे, द्विभाषिक विद्यार्थ्यांना सहज मराठी समजावे यासाठी सांकेतिक भाषेचा वापर सुरू करण्यात आला़ सध्या सांकेतिक भाषेमध्ये हे विद्यार्थी नुसते शब्द नव्हे, तर वाक्य सांगतात़ या सांकेतिक भाषेने विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाबाबत अधिक आवड निर्माण झाली़
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील वातावरणात ज्ञानरचनावादामुळे विद्यार्थ्यांची प्रगती साधण्याचा या शाळेने यशस्वी प्रयत्न सुरू केला आहे़