शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या! सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकासोबत केंद्रीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

By योगेश पायघन | Updated: March 3, 2023 20:59 IST

विद्यार्थ्यांना सुविधेसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग, शैक्षणिक सत्र वेळेत सुरू करण्यासाठी उपाययोजना

छत्रपती संभाजीनगर ः शैक्षणिक वर्ष २०२३-२३ साठी सामायिक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) वेळापत्रक सीईटीसेलकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आले. विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षा, निकाल आणि केंद्रीय प्रवेशासाठी नोंदणीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठीची एमएचटी-सीईटी ९ ते २० मे दरम्यान होणार असून निकाल १२ जुन रोजी जाहीर होईल. तर केंद्रीय प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रीयेला २६ जुलैपासून सुरूवात होणार आहे.

सामाईक प्रवेश परीक्षा व केंद्रीभुत प्रवेश प्रक्रीयेकरीता मोबाईल प्रणालीचा यावर्षी वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी मोबाईल, टॅब्लेट, अॅण्ड्राईड फोन, आयओएस कार्यप्रणाली आधारीत मोबाईल अप्लिकेशन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच मेल एसएमएस, व्हाटसअॅपने सुद्धा विविध सुचना विद्यार्थ्यांना प्राप्त होतील. परीक्षा व नोंदणी काळात आठवड्याचे सात दिवस सकाळी नऊ ते सात वाजेदरम्यान मदत कक्ष सुरू राहील. परीक्षेसंदर्भात परिक्षेच्या आधी ३ दिवस आणि त्यानंतर ३ दिवस मदत कक्षातून सेवा देण्यात येईल. परीक्षा केंद्रासाठी एक नोडल लाॅग इन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच एक केंद्र प्रमुख, एक सर्व्हर व्यवस्थापक, एक नेटवर्क तज्ज्ञ, १५ परीक्षार्थ्यांमागे एक समवेक्षक, १० परीक्षार्थ्यांमागे एक सुरक्षा रक्षक, एक महिला एक पुरूष तपासणीस, एक मुख्य पर्यवेक्षक, एक महिला व पुरूष स्थानिक पोलिसातील हवालदार तसेच सफाईगार सेवा पुरवठादारांमार्फत पुरवण्यात येणार आहे. यावर्षी प्रवेशपत्रावर आणि गुणपत्रिकेवर प्रमाणिकरणासाठी बारकोड, क्यूआरकोड सुरक्षा दिली जाणार आहे. तसेच राज्यात आवश्यकतेनुसार तालुक्याच्या ठिकाणीही परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सीईटी सेकलकडून सांगण्यात आले. एनटीएच्या वेळापत्रकानुसार नीट युजी परीक्षा ७ मे रोजी होणार आहे. कोरोनाकाळात कोलमडलेले शैक्षणिक वेळापत्रक यावर्षी सुरळीत करण्याच्या दृष्टीने व वेळेत पुढील शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या दृष्टीन नियोजन केल्याचे वेळापत्रकावरून दिसते. मात्र, प्रत्यक्षात निकालावर पुढील प्रवेशप्रक्रीयचे भविष्य अवलंबून आले.

असे आहे वेळापत्रक : अभ्यासक्रम -परीक्षा -निकाल - कॅप राऊंड नोंदणी- कट ऑफएमबीए -१८ आणि १९ मार्च -३ एप्रिल -५ एप्रिल, २३ मेएमसीए -२५ आणि २६ मार्च - ११ एप्रिल -१३ एप्रिल -३० मेविधी पाच वर्षे अभ्यासक्रम- - २ एप्रिल -८ एप्रिल -९ एप्रिल -१४ जुलैविधी तीन वर्षे अभ्यासक्रम - २ आणि ३ मे -१० मे -२२ मे -१५ जुलैबीए-बीएस्सी बीएड, बीएड-एमएड -२ एप्रिल -८ एप्रिल -९ एप्रिल -१४ जुलैएमपीएड             - २३ ते २६ एप्रिल -५ मे -१५ मे -२० मेबीएचएमसीटी             -२० एप्रिल -२ मे -२२ मे -१४ जुलैबी प्लॅनिंग             -२३ एप्रिल -२ मे -२२ मे -१४ जुलैफाईन आर्ट             -१६ एप्रिल -२६ एप्रिल -३ मे -१५ जुलैबी. डिझाईन             -३० एप्रिल -२ मे -२२ मे -२६ जुलैकृषी, अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र -९ ते २൦ मे -८ जून -१२ जून -२६ जुलै

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद