शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी तयार केले ५०० रोपटे

By admin | Updated: September 8, 2014 00:54 IST

राम तत्तापूरे , अहमदपूर पर्यावरणाचे संतुलन रहावे म्हणून तालुक्यातील खंडाळी येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांनी पाखरांनी खाल्लेल्या लिंबोळीच्या बिया जमा करून त्यापासून ५०० रोपटे तयार

राम तत्तापूरे , अहमदपूरपर्यावरणाचे संतुलन रहावे म्हणून तालुक्यातील खंडाळी येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांनी पाखरांनी खाल्लेल्या लिंबोळीच्या बिया जमा करून त्यापासून ५०० रोपटे तयार करून गावकऱ्यांना ती शुक्रवारी वाटप केली़ या अभिनव उपक्रमाचे गावकऱ्यांतून कौतुक होत आहे़ दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन ढासळत आहे़ त्याचा परिणाम मानवी जीवनावरही होत आहे़ पर्यावरणाचे संतुलन राखावे म्हणून अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविला आहे़ या शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या जवळपास ५०० विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अशोक हालसे आणि शाळेतील सहशिक्षकांनी परिसरात पाखरांनी खाल्लेल्या लिंबोळीच्या बिया जमा करण्यास सांगितले़ विद्यार्थ्यांनी या बिया जमा केल्या़ त्यानंतर शाळेने शेवग्याच्या बियाही त्यांना उपलब्ध करून दिल्या़ शाळेने प्लास्टिकच्या पिशव्या मोफत देऊन विद्यार्थ्यांना या बिया त्यात लावण्यास सांगितल्या़ शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी जूनमध्ये हे कार्य केले़ जवळपास अडीच महिन्याच्या कालावधीत या बियांचे रोपटे तयार झाले़ गावकऱ्यांनी आपले अंगण, परसबाग व शेतात हे रोपटे लावावे म्हणून जनजागृती करून रोपट्यांच्या संवर्धनाच्या हमीवर नागरिकांना भेट देण्यात आले़ यापूर्वी सन २०१२ मध्ये अंधोरी जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी १ हजार रोपटे तयार करून ग्रामस्थांना वाटप केले होते़ हा अनोखा उपक्रम राबविण्यासाठी सहशिक्षक धनंजय उजनकर, विनायक दराडे, मारोती रूद्रावाड, वैजनाथ सूर्यवंशी, बबन गुळवे, राजकुमार चाटे, गयाबाई लहाने सरस्वती कांबळे, सुरेखा मोरे, पंकज दंडिमे, संजय कराड, शिवाजी चव्हाण यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले़ या अनोख्या उपक्रमाचे जिल्हा परिषद सदस्या प्राचार्या रेखा तरडे, पंचायत समिती सदस्य गणेश पौळ, गटविकास अधिकारी नितीन दाताळ, गटशिक्षणाधिकारी एल़एम़डुरे, सरपंच व्यंकटराव पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष माधवराव शेळके, उपाध्यक्ष प्रशांत शिंदे, उपसरपंच रोहिदास पौळ, अरविंद पौळ यांच्यासह गावकऱ्यांनी कौतुक केले़ (वार्ताहर)