विद्यार्थ्यांनो हार मानू नका, तोडगा निघतोच!
By Admin | Updated: June 19, 2014 00:08 IST2014-06-19T00:08:06+5:302014-06-19T00:08:06+5:30
जालना : विद्यार्थी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मुलांची मानसिकता ओळखून त्यांना जीवनातील अडचणी, समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सक्षम बनविण्याची गरज आहे.

विद्यार्थ्यांनो हार मानू नका, तोडगा निघतोच!
१४ कोटींचा खर्च : स्वीमिंग पूलसह रनिंग ट्रॅक व फुटबॉल, क्रिकेटचे मैदान
गोंदिया : गोंदिया शहरातील क्रीडाप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेली उपेक्षा आता थांबणार आहे. शहरात अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज अशा क्रीडा संकुलाची उभारणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. तब्बल १२ एकरपेक्षा अधिक जागेत साकारल्या जात असलेले हे क्रीडा संकुल येत्या तीन महिन्यात पूर्णत्वास जात आहे. त्यातील विविध सोयीसुविधांमुळे गोंदियातून अनेक क्रीडापटंूच्या उदयाचा मार्ग मोकळा होणार आहे.
शहराच्या मरारटोली भागात साकारल्या जात असलेल्या या क्रीडा संकुलाची आ.गोपालदास अग्रवाल यांनी पाहणी करून या कामांचा आढावा घेतला. यावेळी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता भगत यांच्यासह इतर अभियंते उपस्थित होते. यावेळी माहिती देताना आ.अग्रवाल यांनी सांगितले की, गोंदिया शहरातीलच नाही तर जिल्ह्यातील क्रीडापटंूंना सुसज्ज अशा सोयी असलेले क्रीडा संकुल उपलब्ध नसल्यामुळे त्यांची कुचंबना होत होती. पण या क्रीडा संकुलामुळे गोंदियातील क्रीडापटू विविध क्रीडा प्रकारात नाव कमावल्याशिवाय राहणार नाही.या क्रीडा संकुलासाठी नगर परिषदेने जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतू संकुलाच्या देखभालीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेत्वृत्वातील क्रीडा समितीकडे राहणार आहे. क्रीडांगणाचे बरेचसे काम पूर्णत्वास गेले आहे. पावसामुळे काही दिवस कामात खोळंबा येऊ शकतो. नाहीतर येत्या दोन ते तीन महिन्यात हे क्रीडा संकुल क्रीडापटूंना सरावासाठी सज्ज होईल, असे उपविभागीय अभियंता भगत यांनी सांगितले.
विशेष म्हणजे राज्यात कोणत्याही जिल्ह्यात जिल्हास्तरिय क्रीडा संकुलासाठी ८ कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला नाही. परंतू तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनप्रसंगी प्रथमच गोंदिया जिल्ह्याच्या क्रीडा संकुलासाठी १४ कोटी रुपये मंजूर केले. बैठक गॅलरीवरील छतासाठी १० कोटी आणि इतर सुविधांसाठी आणखी ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सीएसआरच्या फंडातून १० कोटी रुपये देण्यासाठी प्रस्ताव मागितला होता. परंतू जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव देण्यास उशिर केल्याने तो निधी मिळाला नाही, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)