एकाच वेळी विद्यार्थ्यांना घेता येणार दोन पदव्या

By राम शिनगारे | Published: July 6, 2023 08:12 PM2023-07-06T20:12:28+5:302023-07-06T20:13:14+5:30

एमजीएम विद्यापीठाच्या कुलगुरूंची माहिती : नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी

Students can take two degrees at the same time | एकाच वेळी विद्यार्थ्यांना घेता येणार दोन पदव्या

एकाच वेळी विद्यार्थ्यांना घेता येणार दोन पदव्या

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे एमजीएम विद्यापीठात लागू करण्यात आले आहे. या धोरणानुसार एकाच वेळी विद्यार्थ्यांना दोन पदव्या घेता येणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले क्रेडिटस् विद्यार्थ्यांना पूर्ण करावे लागणार असल्याची माहिती एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एमजीएम विद्यापीठाने नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी प्रशासकीय इमारतीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी कुलगुरू डॉ. सपकाळ यांच्यासह कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, आधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, डॉ. हरिरंग शिंदे, प्रा. तन्वीर अहमद, उपकुलसचिव परमिंदर कौर यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. सपकाळ म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नागरिकांना ग्लोबल सिटीझन बनविण्याच्या उद्देशाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहे. या बदलांना एमजीएम विद्यापीठ प्रभावीपणे सामोरे गेले असून, अंमलबजावणीस सुरुवात झाल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यापीठातील सात विद्याशाखा असून, एकदा विद्यार्थ्याने विद्यापीठात प्रवेश केल्यानंतर त्याला कोणत्याही विद्याशाखेत शिक्षण पूर्ण करता येणार आहे. या शाखांमधील मेजर आणि मायनर विषय निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांस असणार आहे. त्यानुसार एकाच वेळी दोन पदव्याही विद्यार्थ्या घेता येऊ शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही वर्षी पडा बाहेर
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पाच वर्षांचा अभ्यासक्रम असणार आहे. पहिल्या वर्षी प्रमाणपत्र, दुसऱ्या वर्षी पदविका, तीन वर्षांनी पदवी आणि चार वर्षांची बॅचलर्स पदवी आणि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यास मिळणार आहे. यातील कोणत्याही वर्षी विद्यार्थ्याना आगमन आणि निर्गमन करता येणार असल्याचेही कुलगुरूं डॉ. सपकाळ यांनी स्पष्ट केले.

Web Title: Students can take two degrees at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.