बसअभावी विद्यार्थ्यांचे वेळापत्रक कोलमडू लागले
By Admin | Updated: July 12, 2014 01:17 IST2014-07-11T23:58:22+5:302014-07-12T01:17:14+5:30
परतूर : परतूर बस आगाराअंतर्गत विविध योजनेतील ये जा करणाऱ्या शाळकरी मुलींची संख्या तीन हजारांच्यावर आहे. अपुऱ्या बसमुळे या मुलींचे शाळेत जाण्यासाठीचे वेळापत्रक कोलमडत आहे.
बसअभावी विद्यार्थ्यांचे वेळापत्रक कोलमडू लागले
परतूर : परतूर बस आगाराअंतर्गत विविध योजनेतील ये जा करणाऱ्या शाळकरी मुलींची संख्या तीन हजारांच्यावर आहे. अपुऱ्या बसमुळे या मुलींचे शाळेत जाण्यासाठीचे वेळापत्रक कोलमडत आहे.
परतूर बस आगाराला ४८ बस आहेत. या बसमधून शसनाच्या विविध योजनेतील मोफत पास घेऊन ये जा करणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींची संख्या १५३१ आहे. मंठा तालुका या आगाराअंतर्गत येत असल्याने याही तालुक्यात जवळपास एवढीच मुलींची संख्या आहे. या मुलींसह इतर प्रवाशांचा भार या अपुऱ्या बसवरच असल्याने शाळकरी मुलींच्या शाळेचे वेळापत्रक कोलमडत आहे. या आगारात मानव विकासच्या दहा बस आहेत. या बसला दोन तालुकयातील सर्वच मार्ग सांभाळणे शक्य नसल्याने बऱ्याचदा मुलींना बसमध्ये जागा मिळत नाही. तर काही मार्गावर या बस जातच नाही. त्यामुळे बऱ्याच गावच्या मुली बसअभावी शाळेत येऊ शकत नाहीत. यातच बस बरोबरच वाहक, चालक यांची प्रत्येकी संख्या ९४ पाहिजे. मात्र ११ वाहक व ६ चालक कमी आहेत.
रजा, आजार यामुळे पुन्हा वाहक, चालक कमी होतात. याचा परिणाम बस वेळेवर होतो.सर्वच शाळांच्या वेळा सारख्याच नसल्यानेही बसचे मार्ग ठरविताना अडथळे येतात. तरी बसची संख्या वाढवण्याबरोबरच चालक वाहकांची संख्या वाढवल्या शिवाय या शाळकरी मुलींची गैरसोय थांबणार नाही. (वार्ताहर)
मुलींसाठी ३० गाड्या पाहिजेत
यासंदर्भात आगारप्रमुख पी. डी. चव्हाण म्हणाले की, दोन्ही तालुक्यांतील जवळपास तीन हजारांहून अधिक मुलींचे वेळापत्रक जुळण्यासाठी मानव विकास एकूण तीस बस लागतात. मुली व प्रवासी यांना या बस अपुऱ्या पडतात असेही चव्हाण म्हणाले.