इमारत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल

By Admin | Updated: June 21, 2014 00:50 IST2014-06-21T00:24:57+5:302014-06-21T00:50:46+5:30

बीड: शहरातील धानोरा रोड भागातील शासकीय निरीक्षणगृहाला गेल्या अनेक महिन्यांपासून भाड्याने चांगल्या प्रकारची इमारत नसल्याने या गृहातील मुलांना घाणीचा सामना करावा लागत आहे.

Students are not getting the building | इमारत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल

इमारत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल

बीड: शहरातील धानोरा रोड भागातील शासकीय निरीक्षणगृहाला गेल्या अनेक महिन्यांपासून भाड्याने चांगल्या प्रकारची इमारत नसल्याने या गृहातील मुलांना घाणीचा सामना करावा लागत आहे. परिसरात अतिशय घाणी असल्याने येथे राहत असलेल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बीड शहरातील धानोरा रोड परिसरात शासकीय निरीक्षणगृह व रिमांड होम आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून या परिसरातील भाड्याच्या जागेमध्ये हे शासकीय निरीक्षणगृह व रिमांड होम आहे. मुलांची संख्या अधिक असून येथे राहत असलेल्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याने निरीक्षणगृहाच्यावतीने जागा स्थलांतरासाठी माध्यमांद्वारे जाहिरात दिली होती मात्र त्याचा कोणाताही लाभ झाला नाही. त्यामुळे जागा स्थलांतराचा प्रश्न अद्यापही कायम आहे. जागा स्थलांतरील झाली नसल्याचा त्रास या निरीक्षण गृहातील विद्यार्थ्यांना करावा लागतोय. या निरीक्षणगृहात बाल गुन्हेगारांना काही दिवसांसाठी सुधारण्यासाठी ठेवण्यात येते. त्याचा कालावधी कमी असून बाल गुन्हेगारांना त्यांचे पालक लवकरच घेऊन जातात. या शिवाय ज्या मुलांना आई नाही किंवा ज्यांचे पालक मुलांचे शिक्षण पुर्ण करु शकत नाहीत त्यांना या निरीक्षणगृहात मोफत प्रवेश दिला जातो. निरीक्षण गृहात विद्यार्थी प्रवेशाची क्षमता पन्नास आहे. त्यामुळे या निरीक्षणगृहात प्रवेश जवळपास पूर्ण होतात. शासकीय योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळतोय तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या इमारतीत रहावे लागत आहे. त्यांच्याकडे व कर्मचाऱ्यांकडे पर्याय नसल्याने त्यांना याच बिल्डिंगमध्ये वास्तव्य करावे लागत आहे.
रिमांड होम म्हटले की मिळतो नकार
शासकीय निरीक्षणगृह व रिमांड होम एकत्र असले तरी यात भरती होणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे ठेवण्यात येते. बाल गुन्हेगारांचा इतर विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांना वेगवेगळे ठेवण्यात येते. या निरीक्षणगृहासाठी नवीन जागा भाड्याने पाहिजे असल्याच्या जाहिराती यापूर्वी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र या शासकीय निरीक्षणगृहास बिल्डिंगचा प्रस्ताव आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
परिसरात घाणच घाण
धानोरा रोड परिसरात असलेल्या बाल निरीक्षणगृहाला घाणीने वेढा घातलेला आहे. प्रवेशद्वाराजवळ असलेल्या गेटच्या बाजूला मोठ्या प्रमाणात घाण निर्माण झाली आहे तर बाल गृहाच्या आवारात पाणी कायम साचलेले असते. या परिसरात नगर परिषदेने नाल्या काढल्या नसल्याने नागरिकांनी वापरलेले पाणी परिसरातच जमा होत आहे. परिणामी बाल निरीक्षण गृहाच्या आवारात बाराही महिने पाणी साचलेले असते. बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता जागा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जागा मिळत नाही. जागा पाहण्यास गेले असता रिमांड होम म्हटले की बिल्डिंग भाड्याने देण्यास नकार देतात.

Web Title: Students are not getting the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.