‘लोकमत’तर्फे विद्यार्थ्यांचे स्वागत
By Admin | Updated: June 17, 2014 01:08 IST2014-06-17T01:02:49+5:302014-06-17T01:08:35+5:30
औरंगाबाद : उन्हाळ्याच्या सुट्यांनंतर सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांमध्ये उत्साह दिसला.

‘लोकमत’तर्फे विद्यार्थ्यांचे स्वागत
औरंगाबाद : उन्हाळ्याच्या सुट्यांनंतर सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांमध्ये उत्साह दिसला. विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले होते. पहिल्या दिवशी विविध शाळांमध्ये लोकमत समूहाच्या वतीने विद्यार्थी आणि शिक्षकांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. लोकमत समूहाच्या या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर पडली.
लोकमतचे वरिष्ठ व्यवस्थापक (रेस) आलोककुमार शर्मा, उपव्यवस्थापक (रेस) सोमनाथ जाधव, शिवप्रसाद कॅतमवार, प्रशांत आरक, प्रताप शिरसाट, गंगाधर पठाडे, धनराज चव्हाण यांनी शहर तसेच वाळूज, पंढरपूर परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापकांना पुष्प देऊन नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
सोनामाता विद्यालयात नगरसेविका ऊर्मिला चित्ते, संस्थेच्या अध्यक्ष विमल तळेगावकर, सचिव सारिका कुलकर्णी, मुख्याध्यापक प्रदीप लाड, श्रॉफ, चैतन्य तळेगावकर, लोकमतचे उपव्यवस्थापक (रेस) सोमनाथ जाधव यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
चिकलठाणा येथील बालाजी हायस्कूल येथे मुख्याध्यापक आर.व्ही. हंकारे यांनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी एन.व्ही . पवार, एस.के. कुलकर्णी, पी.जे. बारहाते, व्ही.एस. पाटील, एस.ए. सरोदे, एस.आर. पाटील, एम.व्ही. जोशी उपस्थित होते.