गुढी उभारून मतदान जागृतीसाठी ‘एसटी’च्या कर्मचाऱ्यांचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:47 IST2019-04-06T21:46:41+5:302019-04-06T21:47:08+5:30
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्याचा कर्मचाऱ्यांनी संकल्प केला.

गुढी उभारून मतदान जागृतीसाठी ‘एसटी’च्या कर्मचाऱ्यांचा संकल्प
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालय , विभागीय कार्यशाळा आणि मध्यवर्ती बसस्थानकात शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त गुढी उभारण्यात आली. यावेळी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्याचा कर्मचाऱ्यांनी संकल्प केला.
याप्रसंगी विभाग नियंत्रक किशोर सोमवंशी, कामगार अधिकारी लक्ष्मीकांत गवारे, महेंद्र पाटील, अजिंक्य जैवळ, रमेश कोलते, अजमल सिद्धीकी, नवनाथ दराडे, रामनाथ देवकर, माधुरी वाघ, मिलिंद ढोके, सचिन सपकाळ, अनिल जाधव, शेख हुजेब, रमेश जाईबहार, जनार्धन विटेकर, चागंदेव वाघमारे, नवनाथ बोडखे आदी उपस्थित होते.
मध्यवर्ती बसस्थानकात मतदानासंदर्भात जनजागृती करण्याची कर्मचाºयांनी शपथ घेतली. याप्रसंगी आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) सुनील शिंदे, योगेश गिते, विजय पारखे, शिवशंकर पाटील, शिवाजी बोर्डे, मनोज पवरे, अल्ताफ अहेमद, रोहिदास चव्हाण, गणेश धनवई, घनशाम म्हस्के, दीपक बागलाने, अनिता सोनगिरे, गायत्री चौधरी, निता भंडारे आदी उपस्थित होते.