सिडको उड्डाणपुलाचे ‘स्ट्रक्चर’च बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 00:39 IST2016-04-27T00:14:27+5:302016-04-27T00:39:14+5:30

विकास राऊत, औरंगाबाद सिडको, वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपुलाचा अग्रसेन चौकाच्या बाजूने काढण्यात आलेल्या उतारामुळे तो पूल अतिशय धोकादायक होण्याची दाट शक्यता आहे.

The 'structure' of the CIDCO flyovers changed | सिडको उड्डाणपुलाचे ‘स्ट्रक्चर’च बदलले

सिडको उड्डाणपुलाचे ‘स्ट्रक्चर’च बदलले

विकास राऊत, औरंगाबाद
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या सिडको, वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपुलाचा अग्रसेन चौकाच्या बाजूने काढण्यात आलेल्या उतारामुळे तो पूल अतिशय धोकादायक होण्याची दाट शक्यता आहे. त्या पुलाचे स्ट्रक्चर बदलल्यामुळे पुलाचा कोर्टाच्या दिशेने उतार वाढला आहे. लोकमतने तज्ज्ञ अभियंत्यांना घेऊन केलेल्या पाहणीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुलाची लांबी वाढवून मिळण्याच्या अपेक्षेपोटी कंत्राटदाराने त्याचे काम वर्षभर लटकवून ठेवले, उतारासाठी वाढीव कॉलमही घेऊन ठेवले; परंतु लांबी वाढविण्यासाठी ३५ कोटी न देण्याचा शासन निर्णय होताच, आहे त्या अवस्थेत ‘अर्थवर्क’ (भराव काम) पूर्ण करण्याच्या दिशेने कंत्राटदाराने पाऊल उचलले. याकडे रस्ते विकास महामंडळाने पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून, औरंगाबादकरांच्या नशिबी आणखी एक अपघाती पूल आला
आहे.
पुलाचे डिझाईन ‘एस’आकारामध्ये
पुलाचे पूर्ण डिझाईन पाहिले तर ते ‘एस’ आकाराचे झाले
आहे. अग्रसेन चौक ते सान्या मोटार्सपर्यंत या पुलाचे डिझाईन पाहिले तर ‘एस’ आकारामध्ये टॉप ते बॉटम असा तो पूल दिसतो. नागमोडी वळणामुळे या पुलावरून वेगाने वाहने जाणे धोकादायक ठरणार आहे.
लांबी न वाढविल्यामुळे बदलला निर्णय
सिडकोतील उड्डाणपुलाची लांबी वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडून स्थगित केल्यामुळे कंत्राटदार, काही लोकप्रतिनिधींच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. त्या पुलाची लांबी ३०० मीटरने वाढवावी, असे पत्र महापालिकेने रस्ते विकास महामंडळाला दिले होते.
रस्ते विकास महामंडळानेदेखील शासनाकडे पाठपुरावा करून ३५ कोटींतून ३०० मीटर लांबी वाढवून मिळावी यासाठी प्रयत्न केला. कंत्राटदाराने यासाठी स्थानिक राजकारण्यांना पायघड्या घातल्या होत्या.
काय आढळून आले पाहणीमध्ये?
लोकमतने केलेल्या पाहणीत आढळून आले की, पुलाचे सिव्हिल वर्क जेथून संपले, तेथून जेथे लँडिंग होत आहे, त्यापर्यंत लांबीच्या तुलनेत जास्त उतार हवा होता. उतार काढण्यात मोठा फरक असल्यामुळे वाहन उतरताना थेट स्पीडने खाली येईल. पुलाच्या एकूण उंचीनुसार जेवढा उतार हवा होता, तेवढा नसल्यामुळे तो पूल अपघाती पूल ठरू शकतो.

Web Title: The 'structure' of the CIDCO flyovers changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.