जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पावसाची हजेरी

By Admin | Updated: August 13, 2015 00:21 IST2015-08-13T00:03:47+5:302015-08-13T00:21:17+5:30

जालना : शहरासह जिल्ह्यात बुधवारीही दमदार पावसाने हजेरी लावत पिकांना उभारी दिली आहे. शहर परिसरातील नाले, ओढे खळखळून वाहत होते.

Strong rain in attendance in the district next day | जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पावसाची हजेरी

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पावसाची हजेरी


जालना : शहरासह जिल्ह्यात बुधवारीही दमदार पावसाने हजेरी लावत पिकांना उभारी दिली आहे. शहर परिसरातील नाले, ओढे खळखळून वाहत होते.
जिल्ह्यात १२ आॅगस्ट २०१५ रोजी सकाळपर्यंत मागील २४ तासांत २२.३८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जालना २४.६३, बदनापूर १६.८०, भोकरदन ५.१३, जाफराबाद ७.२०, परतूर २६.६०, मंठा १८.५०, अंबड ४४.२९ तर घनसावंगी तालुक्यात ३४. ८६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.२१ मिलीमीटर एवढी असून, १ जूनपासून आजपर्यंत २४६.४४ मिलीमीटर पाऊस पडला. त्याची सरासरी ३५.८० एवढी आहे.
एकूणच उशिरा का होईना पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. पावसामुळे बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Strong rain in attendance in the district next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.