मृगाची दमदार हजेरी
By Admin | Updated: June 22, 2014 00:06 IST2014-06-21T23:53:12+5:302014-06-22T00:06:23+5:30
शिरूर अनंतपाळ : तालुक्यात मृग नक्षत्राने दमदार हजेरी लावली असून, गुरुवारी सायंकाळी दीड तास मोठा पाऊस झाल्याने चिंतातूर शेतकऱ्यांंच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़

मृगाची दमदार हजेरी
शिरूर अनंतपाळ : तालुक्यात मृग नक्षत्राने दमदार हजेरी लावली असून, गुरुवारी सायंकाळी दीड तास मोठा पाऊस झाल्याने चिंतातूर शेतकऱ्यांंच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ मृग नक्षत्र सुरु झाल्यानंतरचा पहिला दमदार पाऊस झाला असल्याने शुक्रवारचा मुहूर्त साधत अनेकांनी चाढ्यावर मूट धरली आहे़ त्यामुळे तालुक्यात शेतकऱ्यांची एकच लगबग सुरु झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे़
गुरुवारी ५ वाजण्याच्या सुमारास डिगोळ, सुमठाणा, येरोळ, दैठणा, साकोळ, तिपराळ, शेंद, कानेगाव, तळेगाव, होनमाळ, लक्कड जवळगा, शिवपूर, रापका, आरी, जोगाळा, पांढरवाडी आदी गावांत दमदार पाऊस झाला आहे़ रेंगाळलेल्या शेतीच्या कामांना वेग आला आहे.
सर्वाधिक ६० मि़मी़ नोंद साकोळ मंडळात व शिरूर अनंतपाळात ५५ मि.मी. पाऊस झाला आहे.