शेतकर्‍यांना आकर्षित करण्यासाठी बियाणे कंपन्यांची जोरदार चढाओढ

By Admin | Updated: May 26, 2014 00:31 IST2014-05-25T23:59:37+5:302014-05-26T00:31:34+5:30

भोकरदन : भोकरदन तालुक्यात शेतकर्‍यानी आपल्याच कंपनीचे बियाणांची लागवड करावी यासाठी विविध कंपन्यांची प्रचार करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे.

Strong bout of seed companies to attract farmers | शेतकर्‍यांना आकर्षित करण्यासाठी बियाणे कंपन्यांची जोरदार चढाओढ

शेतकर्‍यांना आकर्षित करण्यासाठी बियाणे कंपन्यांची जोरदार चढाओढ

 भोकरदन : भोकरदन तालुक्यात शेतकर्‍यानी आपल्याच कंपनीचे बियाणांची लागवड करावी यासाठी विविध कंपन्यांची प्रचार करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. काही कंपन्यांनी तर आपल्या कंपनीचे कणीस किती मोठे आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न सुरु असल्रूाचे चित्र आहे. खरीप हंगाम पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. तालुक्यातील शेतकरी या हंगामामध्ये मका, सोयाबीन, मिरची, कापूस यांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्याची शक्यता आहे. नेमका शेतकर्‍यांचा यावर्षी कोणते पीक घेण्यावर भर आहे, याची माहिती बियाणे कंपन्यांकडून होत आहे. खरिपामध्ये शेतकर्‍यांनी आपल्याच कंपनीच्या बियाणांची लागवड करावी यासाठी विविध कंपन्यांनी आठवडी बाजारात बियाणांचा प्रचार करण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. आठवडी बाजारामध्ये तर प्रचाराने कळसच गाठला आहे. काही कंपन्यांनी अनेक कणसे एकत्र करून आपल्या मका बियाणांचे कणीस किती मोठे आहे हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच ज्या बियाणांची जाहिरात करण्यासाठी आठवडी बजारात प्रचारक जातात त्या ठिकाणी काही कंपन्यांनी तर आपले बियाणे बँ्रडकडे शेतकर्‍यांचे जास्तीत जास्त लक्ष जाण्यासाठी बियाणांसाठी बॅन्ड पथकाचा सुध्दा वापर करण्यात येत आहे. मात्र तालुक्यात सध्या राजकारणी लोकांना सुध्दा लाजवेल अशी परिस्थिती सध्या भोकरदन तालुक्यात सुरू आहे. खरीपपूर्व हंगामामध्ये शेतकर्‍याची चांगलीच करमणूक होत आहे़ (वार्ताहर)खरीप हंगाम पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. तालुक्यातील शेतकरी या हंगामामध्ये मका, सोयाबीन, मिरची, कापूस यांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्याची शक्यता आहे. नेमका शेतकर्‍यांचा यावर्षी कोणते पीक घेण्यावर भर आहे, याची माहिती बियाणे कंपन्यांकडून होत आहे. शेतकर्‍यांनाही यातून चांगलीच करमणूक होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Strong bout of seed companies to attract farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.