रस्त्यात अडवून रुग्णाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 21:30 IST2019-07-14T21:30:11+5:302019-07-14T21:30:24+5:30
तरुणाला चौघांनी मारहाण करुन जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री साजापूर-वडगाव रस्त्यावरील सैलानीबाबा दर्गा जवळ घडली.

रस्त्यात अडवून रुग्णाला मारहाण
वाळूज महानगर : बहिणीच्या घरी आलेल्या तरुणाला चौघांनी मारहाण करुन जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री साजापूर-वडगाव रस्त्यावरील सैलानीबाबा दर्गा जवळ घडली.
कैलास सुदाम मगरे (३२) हा साजापूर येथील बहिणीकडे आला होता. शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास कैलास हा वडगाव कोल्हाटी-साजापूर रस्त्याने बहिणीच्या घरी जात असताना येथील सैलानी बाबा दर्गा जवळ चौघांनी रस्त्यात अडवून त्याला मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान, कैलास व त्याच्या पत्नीचा काही वर्षांपासून वाद सुरु असून या दाम्पत्याचा न्यायालयात खटला सुरु आहे. सासरवाडीच्या लोकांनीच अंधाराचा फायदा घेवून मारहाण केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.