कोरोना नियमांचे काटेकोर पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:05 IST2021-04-07T04:05:47+5:302021-04-07T04:05:47+5:30
सिल्लोड : कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने सज्ज राहून सरकारने नव्याने दिलेल्या निर्देशांची काटेकोरपणे ...

कोरोना नियमांचे काटेकोर पालन करा
सिल्लोड : कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने सज्ज राहून सरकारने नव्याने दिलेल्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
सिल्लोड येथील नगर परिषदेच्या सभागृहात मंगळवारी पोलीस प्रशासन व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, यावेळी अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे, उपविभागीय पोलीस अधिकारी व्ही.एन. मराठे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा गायकवाड, तहसीलदार विक्रम राजपूत, मुख्याधिकारी सय्यद रफिक, पोनि. राजेंद्र बोकडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित सरदेसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.योगेश राठोड आदींची उपस्थिती होती. सर्व शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी, मेडिकल मधील स्टाफ, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, शेतकऱ्यांशी निगडित दुकानदार इत्यादीची सर्व प्रथम कोरोना चाचणी करून त्यांचे लसीकरण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. सध्याची परिस्थिती पाहता, तालुक्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अपडाउन खपवून घेणार नाही, तसेच पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी अशा शासकीय यंत्रणेने गावात राहून दररोज परिस्थितीचा आढावा सादर करावा, अशा सूचना सत्तार यांनी दिल्या.
फोटो कॅप्शन : सिल्लोड नगरपरिषदेमध्ये आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार.
060421\img-20210406-wa0214_1.jpg
सिल्लोड नगर परिषदेमध्ये आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार.