थेरगाव अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:25 IST2020-12-17T04:25:42+5:302020-12-17T04:25:42+5:30

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, थेरगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातील आरोपींना कठोर शिक्षा देणे गरजेचे आहे. समाज स्वास्थ ...

Strict action should be taken against the accused in Thergaon atrocity case | थेरगाव अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी

थेरगाव अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, थेरगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातील आरोपींना कठोर शिक्षा देणे गरजेचे आहे. समाज स्वास्थ बिघडविणारे आणि स्त्री शक्तीचा अपमान करणारे कृत्य असून अशा आरोपींना धडा शिकविण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालविला जावा, खटला चालविण्यासाठी निष्णात वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, तसेच पीडितेच्या परिवाराला पन्नास लाखांची मदत करण्यात यावी. यावेळी राष्ट्रवादीत कॉंग्रेसचे तालुका संपर्क प्रमुख दत्ता गोर्डे, तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ, सावता परिषदेचे प्रदेश महासचिव मयूर वैद्य, प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू उबाळे, प्रवक्ते राजीव काळे, शिवानंद झोरे, विष्णु खेत्रे, अशोक बर्डे, शारदा कोथंबीरे, सुमन राजळे, संगीता पवार, बाबासाहेब तांबे, जिल्हाध्यक्ष संजय आढाव, बाबासाहेब जाधव, दिलीप सोनटक्के, योगेश सोलाटे, अमोल तुपे, शिवाजीराव तुपे, विजय ठाणगे, अतिष गायकवाड, रोहिनी काळे, सुप्रिया सत्वधर, ज्योती जाधव यांची उपस्थिती होती.

-------

फोटो - तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करताना सावता परिषदेचे पदाधिकारी.

Web Title: Strict action should be taken against the accused in Thergaon atrocity case