अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे पोलिसांवर ताण

By Admin | Updated: May 19, 2014 01:05 IST2014-05-19T00:25:13+5:302014-05-19T01:05:52+5:30

संदीप अंकलकोटे, चाकूर चाकूर पोलिस ठाण्याचे वाढते कार्यक्षेत्र आणि त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने चाकूर पोलिसांवर कामाचा ताण पडत आहे़

Stress on police due to insufficient employees | अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे पोलिसांवर ताण

अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे पोलिसांवर ताण

 संदीप अंकलकोटे, चाकूर चाकूर पोलिस ठाण्याचे वाढते कार्यक्षेत्र आणि त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने चाकूर पोलिसांवर कामाचा ताण पडत आहे़ रात्रीची गस्त, पोलिस बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेवर ताण पडत आहे़ परिणामी अनेकवेळा या अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे़ आठवडी बाजारातील गस्त, वाहतुकीवर नियंत्रण या सार्‍या समस्या आ वासून उभ्या आहेत़ यामुळे चाकूर पोलिस ठाण्यातील पोलिसांचे संख्याबळ वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे़ चाकूर पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे आहे़ बहुदा जिल्ह्यातील हे एकमेव ठाणे आहे़ तालुक्यातील पाच गावांसह रेणापूर तालुक्यातील काही गावे व अहमदपूर तालुक्यातील ६ गावांचा समावेश अशा एकूण १०४ गावांचा समावेश या चौकीअंतर्गत येतो़ नळेगाव येथे एक आऊटपोष्ट आहे़ त्याअंतर्गत नळेगाव, घरणी व शिवणखेड बु़ हे बीट येतात़ याशिवाय चाकूर हे तालुक्याचे ठिकाण असून, याअंतर्गत बोथी रोहिणा, चापोली, झरी, झरी बु़, वडवळ नागनाथ, जानवळ या बीटचा समावेश आहे़ चाकूर पोलिस ठाण्यातील चार कर्मचारी लातूर ते नांदेड या राज्यमार्गावर सेवेत असतात़ आठवडी बाजार चाकूर, नळेगाव, झरी, चापोली, कारेपूर येथे भरतो़ यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस दल कमी पडते़ परिणामी दारू व अन्य त्रासाला कंटाळून कारेपूर येथील बाजार बंद पाडण्यात आला़ अशीच परिस्थिती अन्य ठिकाणीही आहे़ चाकूरपासून ४८ कि़मी़ अंतरावर पश्चिमेला कारेपूर, पूर्वेला २५ कि़मी़ अंतरावर चिद्रेवाडी, दक्षिणेला २५ कि़मी़ अंतरावर लिंबाळवाडी, शिवणी मजरा, उत्तरेला तेलगाव असे दूरवर गावे आहेत़ परिणामी या पोलिस ठाण्याअंतर्गत येणार्‍या पोलिसांवर ताण पडत असल्याने कर्मचार्‍यांना काही वेळा कुटुंब व आरोग्याकडेही दुर्लक्ष करावे लागत आहे़ यासंदर्भात पोलिस निरीक्षक गजानन सौदाने यांच्याशी संपर्क साधला असता चाकूर ठाण्यातील चार पोलिस निलंबित झाले आहेत़ त्यामुळे वाढीव कर्मचार्‍यांसाठी अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला आहे़ चाकूर पोलिस ठाण्यात ५२ कर्मचारी़़़ चाकूर पोलिस ठाण्यात सध्या ५२ अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत़ यामध्ये १ पोलिस निरीक्षक, १ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, ३ पोलिस उपनिरीक्षक, २ चालक, ४ सहाय्यक पोलिस निरीक्षक, १६ जमादार, १३ नाईक पोलिस कॉन्स्टेबल, ९ पोलिस, ३ महिला पोलिस़ यातील कायमस्वरूपी लागणारे पोलिस बल, ३ ठाणे अंमलदार, १ मोहरील, १ बारनिशी, १ रायटर, ३ वायरलेस, २ चालक, १ पोलिस उपविभागीय कार्यालय चालक, १ आरटीपीसी, २ गुप्त शाखा, १ ट्रेझरी गार्ड, १ न्यायालयीन पोलिस, १ पोलिस अधीक्षक कार्यालय संलग्ण, १ समन्स, १ वॉरंट असे एकूण २० दररोज साप्ताहिक सुटीवर जाणारे कर्मचारी ८, उजळणी कोर्ससाठी जाणारा १, कामानिमित्त रजेवर जाणारे ३ कर्मचारी, नळेगाव आऊटपोष्टला १ पोलिस उपनिरीक्षक, १ एएसआय, ३ पोलिस हेड कॉन्स्टेबल, २ पोलिस कॉन्स्टेबल आहेत़ चाकूर बीटसाठी १ जमादार, २ पोलिस कॉन्स्टेबल बोथी, १ एएसआय, रोहिणा, चापोली, वडवळ व जानवळ येथे प्रत्येकी १ पोहेकॉ़ , झरी बु़ येथे २ दोन पोलिस कर्मचारी आहेत़

Web Title: Stress on police due to insufficient employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.