शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

एकीचे बळ ठरले फलदायी; कोरोनाला ८२८ गावांनी वेशीवरच रोखले !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 1:42 PM

२६ एप्रिल रोजी दौलताबाद येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. हा ग्रामीण भागातील पहिला रुग्ण ठरला.

ठळक मुद्देशहराबरोबर ग्रामीण भागात कोरोनाचा विळखामात्र अनेक उपायांमुळे गावे कोरोनापासून दूर

औरंगाबाद : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागांत दररोज नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. मात्र, या सगळ्यात जिल्ह्यातील तब्बल ८२८ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले आहे. या गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात १५ मार्च रोजी कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाले. तत्पूर्वीच संशयित रुग्ण आढळले. या संशयितांमुळे आरोग्य यंत्रणेला घाम फुटला होता. त्यानंतर पहिला, दुसरा आणि त्यानंतर रोज नव्या रुग्णांचे निदान होऊ लागले. २६ एप्रिल रोजी दौलताबाद येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. हा ग्रामीण भागातील पहिला रुग्ण ठरला. पाहता-पाहता जिल्ह्यातील  रुग्णांची संख्या १८ हजारांच्या घरात गेली. यात ग्रामीण भागांतील रुग्णसंख्येने ५ हजारांचा आकडा ओलांडला. तसेच मृत रुग्णांच्या संख्येनेही १०० चा आकडा गाठला. ग्रामीण भागांत रुग्ण वाढत असले तरी अद्यापही अनेक गावांनी कोरोनाला रोखले आहे. जिल्ह्यातील १ हजार ३६८ गावांपैकी तब्बल ८२८ गावांमध्ये आजपर्यंत एकही रुग्ण आढळला नाही, अशी माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी दिली.

नेमके काय केले?1. गावातील नाल्या व कचराकुंडी परिसरात स्वच्छतेसाठी विशेष साफ सफाई मोहीम राबविण्यात आली .2. गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर व जंतुनाशक फवारणी वेळोवेळी केल्या.3. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून आणलेला काढा नागरिकांमध्ये वाटप करण्यात आला.4. ग्रामस्थांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी औषधी गोळ्यांचे वाटप करण्यात  आले.5. गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी हात धुण्यासाठी साबण तसेच सॅनिटायझर देण्यात आले.6. काही कारणास्तव घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींना सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत सूचना करण्यात आल्या.7. सुरक्षिततेसाठी आरोग्य विभागाने वेळोवेळी मार्गदर्शन केले व त्याचे पालन ग्रामस्थांनी केले.8. बाहेरून येणारे फेरीवाले, फळविक्रेते यांना गावात येण्यास मज्जाव केला. 9. पोलिसांच्या सहकार्याने गावात तीनपेक्षा जास्त व्यक्ती जमा होणार नाहीत, याची दक्षता घेतली.10.ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून गावात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर कडक नजर ठेवली.

प्राथमिक आ. केंद्र-उपकेद्रांची भूमिका कागजीपुरा गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून सर्वेक्षण केले. वेळोवेळी ग्रामस्थांना सूचना देऊन मार्गदर्शन केले. या सर्व सूचनांचे पालन ग्रामस्थांनी केल्याने कोरोनाला गावाबाहेरच ठेवण्यात ते यशस्वी ठरले. 

अंगणवाडी ताई, आशा वर्कर्सचा रोल गावागावांत कोरोना रोखण्यासाठी जी यंत्रणा कार्यरत करण्यात आली. त्याची सुरुवातच अंगणवाडी सेविका, आशा वर्करपासून होते. प्रत्येक गावात नियमित सर्वेक्षण व जेष्ठ नागरिकांची तपासणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, बाहेरून आलेल्यांना होम क्वारंटाईन करणे ही कामे त्यांच्या मार्फत केली जातात, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले.

कोरोनामुक्त गावेघोडेगाव , कागजीपुरा, विरमगाव, धामणगाव, वडोद, सोनखेडा , भडजी, निलजगाव, पैठणखेडा, दावरवाडी, एकतुणी, बोकूड जळगाव, वाहेगाव, माळीवाडगाव, शिंगी, बोलठाण, सिरेगाव, बोरसर, गाढे- पिंपळगाव, लाडगाव, मनूर, जाभई, चारनेर, गेवराई सेमी, अनाड, दीडगाव, वडाळा.

नियम पाळले तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले  तेथे कोरोनाची वाढ कमी आहे. लोकांनी सहकार्य केले, तेथे प्रशासनाच्या उपाययोजना प्रभावी ठरल्या. मात्र, लॉकडाऊन उघडल्यानंतर कोरोनाची भीती कमी होत गेली. त्याठिकाणी मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर,  कमी झाला. त्या गावांमध्ये कोरोना  वाढत असल्याचे समोर आले आहे.  डॉ. मंगेश गोंदावले, सीईओ, जि. प.

१५ मार्च रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला4,173 सध्या उपचार घेणारे रुग्ण572 जणांचा आतापर्यंत मृत्यू13,254 जणांची कोरोनावर मात1,368 जिल्ह्यातील एकूण गावे3,50,000 नागरिक लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध गावांवरून जिल्ह्यात वेगवेगळ्या गावांमध्ये आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद