शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! छत्रपती संभाजीनगरजवळची टेकडीच गेली चोरीला, महसूल प्रशासनाला खबरही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 17:18 IST

तहसीलची तक्रारीस टाळाटाळ; पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून केली अटक, पाच दिवस पोलिस कोठडी

छत्रपती संभाजीनगर : कार, घर, पैसे, सोन्याचे दागिने, वाहन चोरीला गेल्याचे अनेक गुन्हे दाखल होतात. आता मात्र चक्क मोठ्या आकाराची टेकडीच चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. सातारा पोलिस ठाण्यात मूळ जमीन मालक, साताऱ्याचा माजी उपसरपंच आयुब खान जब्बार खान पठाण (रा. सातारा) याच्यावर टेकडी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यास अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सातारा गावातील रहिवासी शब्बीर जब्बार पठाण यांनी पोलिसांकडे गावातील गट क्रमांक २४७ मध्ये जमीन मालक आयुब खान याने त्याच्या मालकीच्या जमिनीमधील मोठी टेकडी चोरल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी यात तपास सुरू केला. त्यात आयुब खान याच्या जमिनीवर मोठ्या आकाराची टेकडी होती. मात्र, त्याने मुरूम विक्रीसाठी ती संपूर्ण नष्ट केली. मुरूम, माती, दगड असे हजारो ब्रास गौणखणिज चोरून विक्री केल्याचे समोर आले. पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, उपनिरीक्षक दिलीप बचाटे यांनी तक्रारीबाबत २९ नोव्हेंबर रोजी अपर तहसील कार्यालयात पत्रव्यवहार केला, तसेच याबाबत पंचनामा करण्याची विनंती केली. त्यावरून ४ डिसेंबर रोजी मंडळ अधिकारी शेखर शिंदे यांनी पंचनामा केला.

१५ हजारांपेक्षा अधिक ब्रास मुरूम, खडी...मंडळ अधिकारी शिंदे यांच्या अहवालानुसार, सदर गटात आयुब खान याची जवळपास ५ ते ६ एकर शेती असून तिथे टेकडी होती. आयुबने ती अवैधरीत्या जेसीबीच्या साहाय्याने पोखरली. अंदाजे १५ हजारांपेक्षा अधिक ब्रास मुरूम, खडी चोरी करून विक्री केला.

या मुद्यांवर दखलपात्र गुन्हा-गौणखणिज ही शासनाची मालमत्ता असते. शासनाच्या परवानगीशिवाय ती विकता येत नाही. अवैधरीत्या ते चोरून विक्री करणे दखलपात्र गुन्हा आहे. आयुबने हा इतका मोठा मुरूम कोणाला, का विकला, त्यात किती रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला? यात मोठ्या रॅकेटचा सहभाग असावा व याच रॅकेटने अन्यत्रही टेकड्या, डोंगर पोखरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.- गौणखनिज चोरी प्रकरणात फौजदारी कारवाई करण्यासाठी ११ डिसेंबर रोजी अपर तहसीलदार कार्यालयाला पोलिसांनी कळवले. मात्र, १७ डिसेंबरपर्यंत संबंधितांनी कारवाईसाठी कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे पोलिसांनी शासनातर्फे फिर्यादी होत आयुब खानवर गुन्हा दाखल केला.

या कलमाअंतर्गत गुन्हाआयुब खान वर बीएनएस अंतर्गतच्या चोरीचे कलम ३०३ -२, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४८ (७), ४८(८) कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

English
हिंदी सारांश
Web Title : Unbelievable! Hill Stolen Near Chhatrapati Sambhajinagar, Authorities Unaware

Web Summary : A shocking incident in Chhatrapati Sambhajinagar: a hill was stolen for its soil and stones. Police arrested Ayub Khan Pathan, the landowner, for illegally mining and selling it. Revenue officials were unaware until police investigation. He faces charges under theft and land revenue acts.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीRevenue Departmentमहसूल विभाग