शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

औरगाबादेत बंददरम्यान तणावपूर्ण वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. काल सोमवारी कायगाव टोका येथे आंदोलक तरुणाने ...

ठळक मुद्देकायगाव टोका पुलावर वाहनांची जाळपोळ : काकासाहेब शिंदे यांच्यावर कायगाव येथे अंत्यसंस्कार, देवगाव रंगारी येथे दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. काल सोमवारी कायगाव टोका येथे आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली. याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले. मराठा क्रांती मोर्चाने आज मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. दरम्यान, बंदला जिल्ह्यात हिंसक वळण मिळाले. कन्नड तालुक्यात एका तरुणाने नदी पात्रात उडी मारली, तर एकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कायगाव टोका येथे बंदोबस्तासाठी तैनात पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली. शहर व परिसरात वाहनांचे दोन शोरूम तसेच पाच रिक्षांवर दगडफेकीचे प्रकार घडले. खासदार खैरे, आमदार झांबड यांना धक्काबुक्की झाली, तर क्रांतीचौक येथे मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राजेंद्र जंजाळ यांनाही पिटाळून लावण्याचा प्रयत्न झाला.

गंगापूर/देवगाव रंगारी : मराठा आरक्षण आंदोलनप्रसंगी सोमवारी गोदावरी नदीत उडी मारल्याने मरण पावलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी कडक पोलीस बंदोबस्तात कायगाव येथील गोदातीरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खा. चंद्रकांत खैरे यांना आंदोलकांनी धक्काबुक्की केल्याने त्यांना पोलीस बंदोबस्तात बाहेर काढावे लागले. याप्रसंगी कायगाव पुलावर आंदोलकांनी अग्निशमन दलाची गाडी तोडफोड करून पेटवून दिली व दगडफेक केली. दरम्यान, येथे बंदोबस्तासाठी आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. श्याम काटगावकर असे या मयत पोलीस कर्मचाºयाचे नावआहे.सकाळी १० वाजता काकासाहेब शिंदे यांचा पार्थिवदेह कायगाव येथील गोदावरी काठावरील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आला असता याठिकाणी मोठी गर्दी उसळली होती. अंत्यविधीची तयारी सुरु असताना खा. खैरे आले असता येथे जमलेल्या तरुणांनी त्यांना या ठिकाणाहून जाण्याचा इशारा केला, मात्र ते उपस्थित जमावासमोर आले. यावेळी जमावातील तरुणांनी त्यांना चले जाव असे म्हणत घोषणाबाजी केली. एवढ्यावर न थांबता त्यांना धक्काबुक्की केली. संतप्त आंदोलकांच्या तावडीतून खैरे यांची पोलीस बंदोबस्तात उपस्थित काही नेत्यांनी रवानगी केली. यानंतर मृत काकासाहेब शिंदे यांच्या लहान भावाने मुखाग्नी दिला. अंत्यसंस्कारानंतर संपूर्ण जमाव घटनास्थळी पोहचला. त्या ठिकाणी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास एक तास ही शोकसभा सुरु होती. दरम्यान, त्या ठिकाणी आलेल्या अग्निशमन दलाच्या वाहनास काही आंदोलकांनी अडवून सदर उलथवून टाकले व पेटवून दिले.संतप्त जमाव यानंतर या पोलिसांवर धावून आला. पोलिसांना गोदावरी पुलापासून ते जुने कायगाव टी पॉइंटपर्यंत अक्षरश: पिटाळून लावले. यात पोलिसांची जवळपास ८ ते १० वाहने जमावाच्या पुढे धावत होते. या ठिकाणी पायी प्रवाशांची धांदल उडाली. जमावाकडून जोरदार दगडफेक करण्यात येत असताना पोलिसांनी मागे फिरणे पसंत केले. सर्व पोलीस बंदोबस्त घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर येवून थांबला होता. यावेळी काही कार्यकर्ते पोलिसांच्या मागे आल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार करून जमाव पांगविण्यासाठी लाठीमार केला. या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी श्याम पाडगावकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. या घटनेनंतर मात्र घटनास्थळी शांतता पसरली होती.सायंकाळी ५ वाजेदरम्यान या ठिकाणी आंदोलक व प्रशासन यांच्यात चर्चा झाली. यावेळी वारकºयांच्या हिताचा विचार करत आंदोलनाचे स्वरूप बदलत आहे, मराठा आरक्षणासाठी सुरु झालेले आंदोलन संपले असे प्रशासनाने समजू नये, राज्याच्या भूमिकेप्रमाणेच आंदोलन सुरु राहणार असल्याचे शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी प्रशासनाचे प्रतिनिधी उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांच्या उपस्थितीत सांगितले. यावरून सदरचा रास्ता रोको स्थगित झाल्याचे सानप यांनी सांगितले. यानंतर बंद असलेला रस्ता वाहतुकीस खुला करून दिला. आता औरंगाबाद- पुणे महामार्ग वाहतुकीस खुला झाला असून दोन दिवसांपासून बंद वाहतुकीची कोंडी फुटली आहे.मयत पोलीस कर्मचारी उस्मानाबादचाऔरंगाबाद येथे बंदोबस्तासाठी पाठविण्यात आलेले उस्मानाबाद येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम लक्ष्मणराव काटगावकर (४६) हे १९९० च्या बॅचचे कर्मचारी होते़ सध्या त्यांच्याकडे पोलीस मुख्यालयात नुकत्याच भरती झालेल्या कर्मचाºयांचे मेस इन्चार्ज म्हणून जबाबदारी होती़ त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे़ मयत श्याम काटगावकर यांचे वडील लक्ष्मणराव काटगावकर हेही पोलीस दलातच कार्यरत होते़ काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले आहे़ हे कुटुंब मूळचे तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील आहे़ मात्र, नोकरीनिमित्त अनेक वर्षांपासून ते उस्मानाबाद शहरात वास्तव्यास आहेत़देवगाव रंगारीत दोघांचा आत्महत्येचा प्रयत्नमंगळवारी सकाळी बंददरम्यान देवगाव रंगारी येथे दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील पुलावर रास्ता रोको सुरू असताना निवेदन घेण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठ्याला पाच मिनिटांत बोलवा, असे म्हणत एका तरुणाने २५ फूट पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तो जखमी झाला असून, त्याला देवगाव रंगारीच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून नंतर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जयेंद्र द्वारकादास सोनवणे (२८, रा. देवगाव रंगारी), असे या तरुणाचे नाव आहे.मंगळवारी देवगाव रंगारी कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. सकाळी १० वाजता नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील वेळगंगा नदीवरील निजामकालीन पुलावर मराठा समाजबांधवांनी रास्ता रोको केला. यावेळी पोलीस बंदोबस्तही होता. याचवेळी आमच्या मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठ्याला पाच मिनिटांत बोलवा, नाही तर मी या पुलावरून उडी मारीन, असे म्हणून जयेंद्रने काही समजण्याच्या आत पुलावरून उडी मारली. यात त्याच्या पाठीला मोठी दुखापत झाली. त्याला लगेच येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्रथमोपचार करून १०८ रुग्णवाहिकेमध्ये घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यासोबत देवगाव रंगारीच्या सहायक पोलीस निरीक्षक स्वप्ना शहापूरकर याही रुग्णालयात रवाना झाल्या. घटना घडल्यानंतर देवगावात औरंगाबादहून २ दंगाकाबू पथक व मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.देवगाव रंगारी येथील एका कार्यकर्त्याने लासूर टी पॉइंटवर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजता घडली. सध्या विष प्राशन करणाºया कार्यकर्त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहे. जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे (५५) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाºया कार्यकर्त्याचे नाव आहे. ही बाब निदर्शनास येताच येथे उपस्थित कार्यकर्त्यांनी तातडीने जगन्नाथ यांना देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, देवगाव रंगारी येथे आंदोलन करणाºया कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, तहसीलदार महेश सुधळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जगन्नाथ सोनवणे यांना प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली. यावेळी प्रशासनाच्या वतीने मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबादreservationआरक्षणagitationआंदोलन