शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 19:39 IST

या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांचा सर्वात मोठा फटका सिद्धार्थ गार्डन परिसराला बसला.

छत्रपती संभाजीनगर: शहरात आज (११ जून) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यांनी थैमान घातले. काही मिनिटांतच शहराच्या अनेक भागांत झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. विजेच्या तारांवर व झाडांवर झालेल्या परिणामामुळे अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. तर सिद्धार्थ गार्डनच्या गेटवरील डोमच्या जवळची भिंत कोसळून दोन पर्यटक महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वादळी वाऱ्यामुळे शहरात एकच गोंधळ उडून जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते. या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांचा सर्वात मोठा फटका सिद्धार्थ गार्डन परिसराला बसला. वादळी वारा सुरू झाल्याने गार्डनमधून पर्यटक बाहेर पडत होते. याच वेळी मुख्य गेटच्या वर असलेल्या डोमजवळील भिंत वाऱ्याच्या तडाख्याने अचानक कोसळली. या दुर्घटनेत तिघेजण मलब्याखाली अडकले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी व स्थानिक प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोन महिलांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. एक पुरुष गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अशी आहेत मृतांची नावेस्वाती अमोल खैरनार ( ३७, रा. धामणगाव, तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव, ह. मू. रांजणगाव शेनपुंजी, वाळूज ) आणि रेखा हरिभाऊ गायकवाड ( ६५, गजानन नगर, टीव्ही सेंटर, हडको) अशी मृतांची नावे आहेत. तर शेख अखिल आणि एक गंभीर जखमी आहेत. दरम्यान, चार लहान मुले देखील यावेळी किरकोळ जखमी झाल्याची माहिती असून ते पालकांच्या सोबत गेले. 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघातDeathमृत्यू