शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
4
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
5
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
6
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
7
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
8
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
9
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
10
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
11
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
12
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
13
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
14
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
15
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
16
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
17
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
18
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
19
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
20
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दुकान फोडून दीड लाख पळविले

By admin | Updated: August 7, 2014 01:27 IST

परभणी: दुकानाचे शटर वाकवून नगदी एक लाख ४५ हजार रुपये पळविल्याची घटना घडली.

परभणी: शहरातील जुन्या मोंढ्यामध्ये दुकानाचे शटर वाकवून नगदी एक लाख ४५ हजार रुपये पळविल्याची घटना ६ आॅगस्ट रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून तपास सुरु आहे.शहरातील जुना मोंढा भागात असलेले दुकान फोडण्याचे प्रयत्न ६ आॅगस्टच्या पहाटे झाले. जुन्या मोंढ्यामध्ये मणियार ट्रेडर्स नावाचे होलसेलचे दुकान आहे. या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश मिळविला आणि दुकानातील गल्ल्यामधील १ लाख ४५ हजार रुपये काढून घेतले. यात १ हजार, ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा आहेत. या भागात असलेल्या इतर दुकानातही चोरीचा प्रयत्न झाला. येथील अ. कुरेशी यांच्या हार्डवेअरच्या दुकानाचे शटरही वाकविण्यात आले. तर त्याच शेजारी असलेल्या अ.कादर यांच्या दुकानाचे शटरही चोरट्यांनी वाकवून चोरीचा प्रयत्न केला. परंतु, या दोन्ही दुकानातून काहीही चोरीला गेले नाही. या प्रकरणी महमद नूर महमद सरवर यांच्या फिर्यादीवरुन नानलपेठ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक आणि नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाला भेट देण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. जी. कोल्थे, बीट जमादार विठ्ठल राठोड, विनोद मुळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंदमणियार ट्रेडर्स या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली कार्यान्वित आहे. या कॅमेऱ्यात दोन चोरटे कैद झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळेच हा प्रकार पहाटे ४.५० वाजेच्या सुमारास झाल्याचे स्पष्ट झाले. दोन चोरट्यांनी जॅक लावून शटर वाकविले असून आतमध्ये प्रवेश करुन ही चोरी केली. ३० ते ३२ वयोगटातील ही चोरटी आहेत. त्यापैकी एकाने पगडी घातल्याचे कॅमेऱ्यात दिसत आहे. पथक रवानादरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेले चोरटे जिल्ह्याबाहेरील असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे नांदेड आणि परतूर या ठिकाणी पोलिस पथक तपासासाठी रवाना केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, जुन्या मोंढ्यात असलेले अन्य दोन दुकानेही फोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु, या ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.