आरक्षणासाठी बंजारा समाजाचा रास्ता रोको
By Admin | Updated: July 26, 2014 00:37 IST2014-07-25T23:54:58+5:302014-07-26T00:37:50+5:30
माजलगाव : बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी माजलगाव येथे शिवाजी चौकात शुक्रवारी रास्ता रोको करण्यात आला.
आरक्षणासाठी बंजारा समाजाचा रास्ता रोको
माजलगाव : बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी माजलगाव येथे शिवाजी चौकात शुक्रवारी रास्ता रोको करण्यात आला. एक तास रास्ता रोको चालल्याने वाहतुक कोंडी झाली होती. यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील व तालुक्यातील बंजारा समाजाची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय आहे. एवढेच नाही तर आर्थिक परिस्थितीमुळे अनेक बंजारा समाजातील तरूण उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशी स्थिती निर्माण झालेली आहे. बंजारा समाज राज्यामध्ये एन.टी. प्रवर्गामध्ये आलेला आहे. मात्र बंजारा समाज हा आदिवासी भटकी जमात असल्याने त्यांचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करावा अशी मागणी यावेळी बंजारा समाजातील कार्यकर्त्यांनी लावून धरली. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाजाला आणण्यासाठी अनुसूचित जमातीमध्ये प्रवेश करणे अत्यंत आवश्यक आहे, असे सांगण्यात आले. यावेळी पं.स. सदस्य जीवन राठोड, शरद चव्हाण, वनिता चव्हाण, पारूबाई जाधव, शांताबाई चव्हाण, विठ्ठल चव्हाण, वसंत राठोड, विजय राठोड, पिंटू राठोड, अंकुश राठोड, सतीश राठोड यांनी सहभाग नोंदविला. (वार्ताहर)