शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात पाण्याची नासाडी थांबेना

By admin | Updated: March 4, 2016 23:28 IST

नांदेड : विष्णूपुरी जलाशयातील साठा झपाट्याने कमी होत असून सध्या १४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ या पाण्यावरच पुढील पावसाळ्यापर्यंत नांदेड शहराची तहान भागणार आहे़

नांदेड : विष्णूपुरी जलाशयातील साठा झपाट्याने कमी होत असून सध्या १४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ या पाण्यावरच पुढील पावसाळ्यापर्यंत नांदेड शहराची तहान भागणार आहे़ सबंध मराठवाडा पाणीटंचाईने होरपळून निघाला असताना नांदेडात मात्र पिण्याच्या पाण्याची मोठी नासाडी होत आहे़ तीन दिवस सुटणाऱ्या पाण्याचे वेळापत्रक निश्चित नसल्यामुळे दोन, दोन तास नळाचे पाणी वाया जात आहे़ नळाचे पाणी नाल्यात सोडले जात असून रस्ते, अंगण, वाहने धुण्याचे प्रकार पाहण्यास मिळत आहे़ अनेक नळाला तोट्या नसल्यामुळे हे पाणी अक्षरक्ष: वाया जात आहे़ येणाऱ्या काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़ यासाठी महापालिकेने पाणीबचतीचे कोणतेच धोरण अद्याप जाहीर केले नाही़ पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी प्रत्येक भागात मनपाची पथके पाहणी करणार असल्याची घोषणाही फोल ठरली आहे़ रस्त्यावर नळाचे पाणी टाकणे, नालीत पाणी सोडणे, प्राणी धुणे, वाहने धुणे, नळाला तोट्या नसणे आदी प्रकार वाढत आहेत़ अनेक नागरिकांच्या घरात बोअर व नळ असल्याने ते नळाच्या पाण्याचा उपयोग इतर कामासाठी करत आहेत़ तर दुसरीकडे ज्यांना नळाचा पाणी मिळत नाही, ते घोटभर पाण्यासाठी वणवण भटकताना दिसत आहेत़ पाणीटंचाईचे संकट समोर असताना नागरिक पाणी बचतीचे गांभीर्य बाळगण्यास तयार नाहीत़ नागरिकांसोबतच महापालिकेकडूनही काही भागात अतिरिक्त पाणीपुरवठा होत असून काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे़ या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने पाणी सोडण्याच्या वेळेत पाणीगळती व नासाडी थांबविण्याची गरज आहे़ मराठवाड्यातील लातूर, परभणी, बीड, उस्मानाबाद हे जिल्हे पाण्यासाठी व्याकूळ झाले आहेत़ पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो गावातील नागरिकांनी स्थलांतर केले आहे़ तर मोठ्या शहरातील नागरिकही मिळेल त्या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत़ एकीकडे अशी परिस्थिती असताना नांदेडात मात्र पाण्याचा अपव्यय होत आहे़ रात्रीच्या वेळेस पाणी सोडले जात आहे़ त्यामुळे नागरिक आपले पाणी भरल्यानंतर नळाचे पाणी नालीत सोडून देत आहेत़ काही नागरिक तीन दिवस साठवलेले पाणी नळ सुटल्यानंतर रस्त्यावर उलटून देत आहेत़ पुन्हा पाणी भरत आहेत़ पाण्याचे महत्व अद्याप नागरिकांना कळत नसल्यामुळे येणाऱ्या काळात पाणी टंचाईचे संकट गडद होणार आहे़ सध्या विष्णूपुरी जलाशयात १३़ ५४ दलघमी पाणी उपलब्ध असून पाणीपातळी ३४८़७५ मीटरवर आहे़ एकूण क्षमतेच्या १६़७५ टक्के पाणी जलाशयात आहे़ (प्रतिनिधी)