तीर्थक्षेत्र तुळजापुरातील प्रसादाच्या लाडूची विक्री बंद

By Admin | Updated: December 9, 2015 00:40 IST2015-12-09T00:38:14+5:302015-12-09T00:40:48+5:30

उस्मानाबाद : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे देवीभक्तांसाठी मागील सात वर्षांपासून वाटप करण्यात येणाऱ्या प्रसादरूपी लाडूची मागील आठ दिवसांपासून विक्री बंद पडली आहे़

Stop selling Prasad's laddu in Tilajaput area | तीर्थक्षेत्र तुळजापुरातील प्रसादाच्या लाडूची विक्री बंद

तीर्थक्षेत्र तुळजापुरातील प्रसादाच्या लाडूची विक्री बंद


उस्मानाबाद : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे देवीभक्तांसाठी मागील सात वर्षांपासून वाटप करण्यात येणाऱ्या प्रसादरूपी लाडूची मागील आठ दिवसांपासून विक्री बंद पडली आहे़ मंदिर संस्थानकडे १६ लाख बील थकल्याने ठेकेदाराने लाडू पुरवठा बंद केला असून, मंदिरात प्रसादाचे लाडू मिळत नसल्याने भाविकांमधून मात्र, तीव्र संताप व्यक्त होत आहे़
तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सन २००८ पासून प्रसाद रुपी लाडूची विक्री केली जात होती. मंदिर समितीकडून एक लाडू दहा रूपये प्रमाणे विक्री केला जात असे. लाडूच्या विक्रीतून लाखोंचा नफा मंदिर संस्थानला मिळत असताना या संस्थानने मागील सात वर्षांपासून तिरूपतीच्या धर्तीवर लाडू तयार करणारी यंत्रणा उभा केलेली नाही़ प्रत्येक वर्षी लाडू निर्मितीचे टेंडर दिले जात आहे़ सध्या लाडूचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचे सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१५ या तीन महिन्यांच्या कालावधीतील १६ लाख रूपये थकले आहेत़ त्या ठेकेदाराने मंदिर संस्थानकडे वेळोवेळी खेटे मारूनही थकीत बिलाची रक्कम मिळत नसल्याने अखेर संस्थानला लेखी पत्र दिले आहे़ या पत्रात थकबाकी दिल्याशिवाय लाडूचा पुरवठा केला जात नसल्याचे नमूद केले होते़ मात्र, मंदिर प्रशासनाने याची कुठलीच दखल न घेतल्याने ठेकेदाराने लाडूचा पुरवठा मागील आठ दिवसांपासून बंद केला आहे़ दरम्यान, सर्व यंत्रणा असतानाही तुळजाभवानी मंदीर संस्थानकडून लाडू निर्मितीसाठी स्वत:ची यंत्रणा उभी करण्याकडे डोळेझाक होताना दिसत आहे़ दरम्यान, याबाबत मंदिर संस्थानचे सहाय्यक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रूग्णालयात असल्याचे कारण पुढे केले़ तर इतर अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही़ (प्रतिनिधी)

Web Title: Stop selling Prasad's laddu in Tilajaput area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.