अवैध दारू विक्रीला आळा घाला; शार्दूलवाडी येथील महिला पोलीस ठाण्यावर धडकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 14:06 IST2019-02-18T14:05:14+5:302019-02-18T14:06:23+5:30
गाव परिसरात अवैध दारू निर्मिती आणि विक्री सुरु आहे

अवैध दारू विक्रीला आळा घाला; शार्दूलवाडी येथील महिला पोलीस ठाण्यावर धडकल्या
खुलताबाद (औरंगाबाद ) : वेरूळ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शार्दूलवाडी येथे गावठी दारू निर्मिती आणि विक्री सुरु आहे. यामुळे काही ग्रामस्थ व्यसनाच्या आहारी गेल्याने कुटुंबात आणि गावात अशांतता आहे. या अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीवर आळा घालावा या मागणीसाठी येथील महिलांनी आज खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, खुलताबाद तालुक्यातील वेरूळ ग्रूप ग्रामपंचायत अंतर्गत शार्दूलवाडी गाव आहे. येथील माटेगाव धरण क्षेत्रात काहीजण अवैधरीत्या (गावठी) हातभट्टीची दारूची निर्मिती करत आहेत. काही ग्रामस्थ या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. यामुळे कुटुंबामध्ये अशांतता पसरली आहे. या ठिकाणची दारू निर्मिती आणि विक्रीला आळा घालावा या मागणीसाठी आज येथील महिलांनी खुलताबाद पोलीस ठाण्यावर धडक मारून तक्रार दिली.