पाण्यासाठी खांडवीत रास्ता रोको

By Admin | Updated: April 23, 2016 23:57 IST2016-04-23T23:28:58+5:302016-04-23T23:57:28+5:30

गेवराई : तालुक्यातील खांडवी येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, शनिवारी महिलांनी गावातील वेशीत तासभर रास्ता रोको आंदोलन केले.

Stop the road to water | पाण्यासाठी खांडवीत रास्ता रोको

पाण्यासाठी खांडवीत रास्ता रोको

गेवराई : तालुक्यातील खांडवी येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, शनिवारी महिलांनी गावातील वेशीत तासभर रास्ता रोको आंदोलन केले.
भ्रष्टाचार निर्मुलनचे अशोक जगंले याच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी रिकाम्या हंड्यांसह वेशीत ठिय्या दिला. यावेळी ग्रामसेवक व सरपंचाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाने गाव दणाणून गेले.
रूक्मिण पगारे, मीरा गाडीवान, ज्योती सुरवसे, मीरा जगंले, लक्ष्मी थोरात, संजिवनी थोरात, संगीता थोरात, सुनीता गायकवाड, सुलोचना गांजले, विमल सुरवसे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)

Web Title: Stop the road to water