गोदापात्रातून अवैध वाळू उपसा थांबवा-जेथलिया
By Admin | Updated: April 22, 2015 00:37 IST2015-04-22T00:22:31+5:302015-04-22T00:37:49+5:30
जालना : गोळेगाव येथील गोदावरीच्या पात्रातून नियमबाह्य बेसुमार वाळू उपसा होत असून अवजड वाहनाद्वारे वाहतूक होत असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे

गोदापात्रातून अवैध वाळू उपसा थांबवा-जेथलिया
जालना : गोळेगाव येथील गोदावरीच्या पात्रातून नियमबाह्य बेसुमार वाळू उपसा होत असून अवजड वाहनाद्वारे वाहतूक होत असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून त्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी केली आहे.
गोळेगाव येथील गोदावरीच्या पात्रातून लिलावापेक्षा अधिक वाळू पोकलेन, जेसीबीद्वारे खड्डे करुन उपसा सुरु आहे. सदर वाळू जड वाहनाद्वारे ताडपत्री टाकून ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. त्यामुळे गोळेगाव ते आष्टी, परतूर, वाटूर, जालना, औरंगाबाद या रस्त्याची चाळणी होत आहे. याकडे संबंधित यंत्रणा हेतूत: दुर्लक्ष करीत आहे की काय, अशी शंकाही जेथलिया यांनी व्यक्त केली आहे.