शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात दगड घालून इसमाचा खून

By admin | Updated: May 13, 2014 01:12 IST

टेंभूर्णी : जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी येथे डोक्यात दगड घालून गोपीनाथ धुराजी गोफणे (वय ४५) या इसमाचा खून करण्यात आला.

टेंभूर्णी : जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी येथे डोक्यात दगड घालून गोपीनाथ धुराजी गोफणे (वय ४५) या इसमाचा खून करण्यात आला. ही घटना १२ मे रोजी उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. गोपीनाथ गोफणे हे गेल्या दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. टेंभूर्णी येथील क्रांतीनगर भागात ते एकटेच राहत होते. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह नालीत आढळून आला होता. या प्रकारामुळे खळबळ उडाली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. गोफणे यांच्या डोक्यावर, तोंडावर जखमा आढळून आल्या होत्या. त्यामुळे हा खून झाल्याचे प्राथमिक पाहणीतच निष्पन्न झाले होेते. शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी गिरीश अग्रवाल यांनी केले. उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत देशमुख यांनीही घटनास्थळी भेट दिली. प्रभारी सपोनि विनोद इज्जपवार, जमादार एस.जी. चव्हाण, देवीदास जावळे, नरहरी खार्डे यांनी तपासाची चके्र फिरवून किरण तेजराव गोफणे व दीपक तेजराव गोफणे या दोघांना अटक केली. आरोपींविरुद्ध टेंभूर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर) अपघातात एक ठार जालना - भरधाव अ‍ॅपेरिक्षा व ४०७ टेम्पोची समोरासमोर धडक होऊन रिक्षातील एकजण ठार झाला. तर अन्य काही जणांना किरकोळ जखम झाली. ही घटना बदनापूर - नानेगाव रस्त्यावरी ढोकसाळ फाट्याजवळ रविवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली. अपघातात मयत झालेल्या प्रवाशाचे नाव शेख जानेमियाँ शेख हिराजी (वय ४५ ) असे आहे. याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपघातातील जखमींवर प्राथमिक उपचार झाले.