तीन लाखांची चोरीची वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:33 IST2017-10-18T00:33:46+5:302017-10-18T00:33:46+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेऊन चार दुचाकी, एक कार, सिमेंट मिक्सर अशी तीन लाख पाच हजार रुपये किमतीची वाहने जप्त केली.

Stolen vehicles seized | तीन लाखांची चोरीची वाहने जप्त

तीन लाखांची चोरीची वाहने जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेऊन चार दुचाकी, एक कार, सिमेंट मिक्सर अशी तीन लाख पाच हजार रुपये किमतीची वाहने जप्त केली. मंगळवारी ही कारवाई झाली.
जालना शहरातील सदर बाजार हद्दीतून सिमेंट मिक्सर वाहन चोरीस गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. हे वाहन चोरी करणा-याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने लालबाग परिसरात राहणा-या सुभाष कांबळे यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने एक लाख रुपये किमतीचे सिमेंट मिक्सर चोरल्याची कबुली दिली. दरम्यान, अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील शाम पवार (२४) याने चार दुचाकी व एक कार चोरल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चार दुचाकी व एक कार असा दोन लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Stolen vehicles seized