लगीनघाईने एसटीला झाला ३४ लाखांवर फायदा
By Admin | Updated: May 13, 2014 01:08 IST2014-05-12T23:45:14+5:302014-05-13T01:08:23+5:30
लातूर : उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईचा लाभ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागास चांगलाच झाला आहे़

लगीनघाईने एसटीला झाला ३४ लाखांवर फायदा
लातूर : उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईचा लाभ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागास चांगलाच झाला आहे़ अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत विभागाचे उत्पन्न ३४ लाख रुपयांनी वाढले आहे़ औसा आगाराच्या उत्पन्नाची टक्केवारी १०़१४ असून ती विभागात सर्वाधिक आहे़ आर्थिक नुकसानीत रुतलेली एसटीची चाके बाहेर काढण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने विविध प्रयत्न करण्यात येत आहेत़ नवनवीन योजना, उपक्रम राबवून प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ उन्हाळी सुट्टी हा एसटीला उत्पन्न वाढवून देणारा हंगाम असतो़ लातूर विभागाने या हंगामाचा फायदा करुन घेण्यासाठी ज्यादा बसेस सुरु करण्याबरोबरच लांब पल्ल्याच्या ठिकाणासाठी प्रवाशांच्या सोईच्यावेळी बसेस उपलब्ध केल्या आहेत़ त्यामुळे १ मे ते १० मे या अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत लातूर विभागास ३४ लाखांचा फायदा झाला आहे़ गेल्या वर्षीच्या मे महिन्यातील सुरुवातीच्या दहा दिवसांच्या कालावधीत लातूर विभागाचे उत्पन्न ४ कोटी ९२ लाख ३७ हजार रुपये झाले होते़ यंदा ५ कोटी २६ लाख ५४ हजार रुपये असे झाले आहे़ वाढीव उत्पन्नाची टक्केवारी ६़९४ अशी आहे़ गतवर्षीचे उत्पन्न आणि कंसात यंदाचे आगारनिहाय उत्पन्न पुढीलप्रमाणे- लातूर- १ कोटी ४६ लाख ३ हजार (१ कोटी ५३ लाख ६२ हजार), उदगीर- १ कोटी १४ लाख ६० हजार (१ कोटी २१ लाख ६२ हजार), अहमदपूर- ७८ लाख ६० हजार (८३ लाख ५८ हजार), निलंगा- ८४ लाख २ हजार (९१ लाख १९ हजार), औसा- ६९ लाख १२ हजार (७६ लाख १३ हजार) असा आहे़ (प्रतिनिधी)