अपहृत मुलीचा अद्याप शोध लागेना

By Admin | Updated: May 21, 2014 00:18 IST2014-05-21T00:06:11+5:302014-05-21T00:18:35+5:30

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील अपहृत दुसरी मुलगी लक्ष्मी सोनुने हिचा अद्याप शोध लागलेला नाही.

Still not search for the kidnapped girl | अपहृत मुलीचा अद्याप शोध लागेना

अपहृत मुलीचा अद्याप शोध लागेना

 वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील अपहृत दुसरी मुलगी लक्ष्मी सोनुने हिचा अद्याप शोध लागलेला नाही. या घटनेत पहिल्या मुलीचा खून झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी वालसावंगीत कडकडीत बंद पाळण्यात आला. १९ मे रोजी वालसावंगी येथील वैद्यकीय अधिकारी अनिल वाघमारे यांची ६ महिन्यांची चिमुकली पायल या मुलीचा खून करून लक्ष्मी सोनुने (वय ८ वर्षे) या मुलीचे अपहरण करण्यात आले. पोलिस यंत्रणेने वालसावंगीत दोन दिवसांपासून ठाण मांडले असून अद्याप आरोपीना अटक झालेली नाही. अपहरण करण्यात आलेल्या लक्ष्मी सोनुनेचा शोध पोलिसांनी लावला नाही. शोध तात्काळ लावावा, आरोपींना अटक करावी अशी मागणी कृउबाचे सभापती अरूण वाघ, पंचायत समितीचे सभापती लक्ष्मण मळेकर, सरपंच अरूणा वाघ, जि़प़ सदस्य शंकर भुते, किरणराजे कोथळकर, गणेश पायघन, विशाल आस्वार, संदीप गवळी, सुनील तेलग्रे, सुभाष वाघ, भागवत गवळी, गणेश आपार यांच्यासह वालसावंगी येथील ग्रामस्थांनी केली आहे़ (वार्ताहर) गेल्या दोन दिवसांपासून वालसावंगी येथे पोलिस यंत्रणा ठाण मांडून असून सदर घटनेच्या तपासकामी वरिष्ठ अधिकारी सातत्याने सूचना करीत आहेत. या प्रकरणाकडे हे अधिका२ी लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Still not search for the kidnapped girl