टँकरने पादचार्यास चिरडले
By Admin | Updated: May 19, 2014 01:04 IST2014-05-19T00:58:43+5:302014-05-19T01:04:52+5:30
नळदुर्ग : महामार्ग ओलांडत असताना पादचार्या एका टँकरने समोरून जोराची धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री नळदुर्ग-सोलापूर रस्त्यावरील तुळजापूर फाट्यावर घडली

टँकरने पादचार्यास चिरडले
नळदुर्ग : महामार्ग ओलांडत असताना पादचार्या एका टँकरने समोरून जोराची धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री नळदुर्ग-सोलापूर रस्त्यावरील तुळजापूर फाट्यावर घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नळदुर्ग येथील इंदिरानगर भागात राहणारे महंमद गुलाब पठाण (वय ४२) हे शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमारास राष्टÑीय महामार्ग ओलांडून घराकडे जात होते. यावेळी तुळजापूर फाट्याजवळ हैैदराबादहून सोलापूरकडे जाणार्या टँकर (क्र. एमएच ०४/ एबी ३९८) च्या चालकाने त्यास समोरून जोराची धडक दिली. यात महंमद पठाण हे जागीच ठार झाले. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला. याप्रकरणी हिरालाल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात टँकर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपघातानंतर टँकर चालकाने वाहनासह पोबारा केल्यामुळे नळदुर्ग पोलिसांनी विविध ठिकाणच्या पोलिस ठाण्यांना सदरील टँकरचा नंबर कळवून नाकाबंदीही केली. तसेच सोलापूर मार्गावर टँकरचा पाठलागही केला. रात्री तीन वाजेच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावाजवळ पोलिसांना हा टँकर मिळून आला. यावरून सपोनि एम. वाय. डांगे व त्यांच्या सहकार्यांनी तो ताब्यात घेऊन नळदुर्ग येथे आणला. मात्र, चालक अद्याप फरार आहे. (वार्ताहर)