लिंकरोड चौकात एसटीला ट्रकची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:29 IST2019-03-11T23:29:17+5:302019-03-11T23:29:25+5:30
बुलढाणा येथून औरंगाबाद मार्गे पुण्याला जाणाऱ्या एसटीला लासूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. मात्र, बसचालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील ३० प्रवाशी बालंबाल बचावले आहेत.

लिंकरोड चौकात एसटीला ट्रकची धडक
वाळूज महानगर : बुलढाणा येथून औरंगाबाद मार्गे पुण्याला जाणाऱ्या एसटीला लासूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. मात्र, बसचालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील ३० प्रवाशी बालंबाल बचावले आहेत. ही घटना सोमवारी पहाटे औरंगाबाद-नगर महामार्गावरील लिंकरोड चौकात घडली.
एसटी महामंडळाच्या बुलढाणा आगाराची बुलढाणा-पुणे ही बस (एमएच-४०, एक्यु-६४४९) सोमवारी पहाटे प्रवासी घेवून औरंगाबाद मार्गे पुण्याला जात होती. महामार्गावरील लिंकरोड चौकात दीड वाजेच्या दरम्यान पैठण लिंकरोडकडून लासूरकडे खरबूज घेवून जाणाºया भरधाव ट्रकने (आरजे-१९, जीसी- ३२३७) एसटीला जोराची धडक दिली. यामुळे एसटी रस्त्याच्या कडेला गेली.
मात्र,चालकाने प्रसंगावधान राखून एसटी कंट्रोल केल्यामुळे एसटी पलटी झाली नाही. बसमधील ३० प्रवाशी सुखरुप बचावले आहेत. या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी बसचालक समाधान नरवडे यांच्या फिर्यादीवरुन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालक सुमेर कानाराम भिल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.