शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

एस़टी़ला प्रभारींचाच ‘दे धक्का’

By admin | Updated: December 22, 2014 01:03 IST

व्यंकटेश वैष्णव ,बीड ‘ बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेवून प्रवाशांची अविरत सेवा करणारी बसगाडीला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचे ग्रहन लागले आहे

 

व्यंकटेश वैष्णव ,बीड ‘

बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेवून प्रवाशांची अविरत सेवा करणारी बसगाडीला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचे ग्रहन लागले आहे. यामध्ये चार एसटी आगारांचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू असल्याने जिल्ह्यातील परिवहन महामंडळाचे नियोजन पुरते कोलमडले असल्याचे चित्र पहावयास मिळते. जिल्ह्यात बहुतांश शासकीय कार्यालयांचा कारभार प्रभारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर चालतो. रिक्त पदांची घरघर कायमची असल्याने नागरिकांच्या फायद्याचे अथवा इतर निर्णय घेण्यासाठी संबंधीत कार्यालयांना विलंब लागतो. असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य परिवहन महा मंडळा अंतर्गत बीडसाठी एकूण २१ अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत, परंतु केवळ १० अधिकाऱ्यांवरच जिल्ह्यातील आठ आगारांचा कारभार चालतो. याशिवाय जिल्ह्यातील एकूण आठ आगारांपैकी चार आगारांचे प्रमुख प्रभारी आहेत. यामध्ये आष्टी, अंबाजोगाई, पाटोदा, गेवराई येथे पूर्णवेळ आगार प्रमुख आहेत. मात्र बीड, परळी, धारूर, माजलगाव या आगारांना मागील अनेक महिन्यापासून पूर्णवेळ आगार प्रमुख नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील आठ आगारांच्या मिळून पाचशेच्या जवळपास बसगाड्या आहेत. दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या यामुळे उपलब्ध यंत्रणा अपुरी पडत आहे. यातच पूर्णवेळ काम करणारे अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रभारी अधिकारी कामकाजासाठी पुरेसा वेळ देत नसल्याचे पहावयास मिळत आहे.४ बीड आगाराच्या अंतर्गत १०० कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी केवळ ४५ कर्मचारी कार्यरत आहेत. विविध ठिकाणी पदे रिक्त असल्याने एका कर्मचाऱ्याकडे दोन ते तीन ठिकाणचा पदभार स्वीकारावा लागत आहे. असे कर्मचाऱ्यांनी खाजगीत सांगितले.