मेमध्येही पाणीपातळी तग धरून
By Admin | Updated: May 25, 2014 01:10 IST2014-05-25T00:51:10+5:302014-05-25T01:10:01+5:30
बीड: जिल्ह्यात सूर्य आग ओकत असला तरी समाधानकारक झालेल्या पावसाने जिल्ह्याची पाणीपातळी अद्यापही तग धरून आहे. याला अवकाळी पावसाचाही फायदा झाला आहे.

मेमध्येही पाणीपातळी तग धरून
बीड: जिल्ह्यात सूर्य आग ओकत असला तरी समाधानकारक झालेल्या पावसाने जिल्ह्याची पाणीपातळी अद्यापही तग धरून आहे. याला अवकाळी पावसाचाही फायदा झाला आहे. यामुळे जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत पाणीटंचाई अल्प आहे. गतवर्षी जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला होता. यामुळे गाव, वाडी-वस्त्यांवरील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. यामुळे जिल्ह्यात पाचशेच्या वर टॅँकर सुरू करण्यात आले होते. त्यावेळी जिल्ह्याची पाणीपातळीही तब्बल ९ मीटरपर्यंत खालावली होती. नंतर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्याची पाणीपातळी वाढली आहे. अवकाळी पाऊस झालेल्या ठिकाणी पाणीपातळी अद्यापही तग धरून असल्याने अनेक ठिकाणी ग्रामस्थांना अद्यापही समाधानकारक पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या १२६ विहिरींवर पाणीपातळी घेण्यात आली असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या कार्यालयातून देण्यात आली. गतवर्षी जिल्ह्यात अल्प पाऊस झाल्याने पाणीपातळी ८.६२ पर्यंत खालावली होती. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने पाणीपातळी ७.४७ पर्यंत आली आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांत पाणीपातळी वाढली असली तरी बीड, केज व वडवणी तालुक्यातील पाणीपातळी अल्प प्रमाणात घटली आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून दिवसेंदिवस ऊन वाढत आहे. यामुळे शेतकर्यांसह सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरींची पाणीपातळी घटली आहे. तसेच विविध ठिकाणच्या कूपनलिकांचीही पाणीपातळी घटली आहे. अशा ठिकाणी आज पाणीटंचाई आहे. मात्र, ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे तेथे पाणीपातळी तग धरून आहे. वरिष्ठ भू-वैज्ञानिक बी.एस.मेश्राम म्हणाले की, जिल्ह्याची पाणीपातळी अद्याप समाधानकारक आहे. यामुळे पाणीप्रश्न गंभीर नाही; परंतु काही ठिकाणी जलभरण व ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ सारखे उपक्रम राबविले जात नसल्याने तेथील पाणीप्रश्न गंभीर बनत आहे. यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले.(प्रतिनिधी) तालुका नमुना घेतलेल्या विहिरी पाणीपातळी वाढ/घट अंबाजोगाई १२ ७.०५१.७३ आष्टी २३ ७.८३ ०.४० बीड १७ ९.८९ - ०.४३ धारूर ०३ ७.२०१.५९ ेगेवराई १७ ८.६०२.२३ केज ०३ ७.९० - ०.१९ माजलगाव १६ ६.६५ ३.१५ परळी १० ४.०३२.८८ पाटोदा ०९ ६.२४ १.१५ शिरूर १० १०.३७ ०.४६ वडवणी ०६ ६.४५ - ०.३५