दिनकर मनवर, सुरेश पाटील यांना राज्य महिला आयोगाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:48 IST2018-10-11T23:46:59+5:302018-10-11T23:48:35+5:30
मुंबई विद्यापीठाने कला शाखेच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्र मात समाविष्ट केलेल्या कवी दिनकर मनवर यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कवितेत आदिवासी महिलांविषयक आक्षेपार्ह वाक्यरचना केल्याची तक्रार विविध संघटनांनी राज्य महिला आयोगाकडे केली आहे.

दिनकर मनवर, सुरेश पाटील यांना राज्य महिला आयोगाची नोटीस
औरंगाबाद : मुंबई विद्यापीठाने कला शाखेच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्र मात समाविष्ट केलेल्या कवी दिनकर मनवर यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कवितेत आदिवासी महिलांविषयक आक्षेपार्ह वाक्यरचना केल्याची तक्रार विविध संघटनांनी राज्य महिला आयोगाकडे केली आहे.
या तक्रारींची दखल घेत राज्य महिला आयोगाने मुंबई विद्यापीठाला भूमिका स्पष्ट करणारा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, कुलगुरू अथवा अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून हा अहवाल द्यावा, असे नमूद केले आहे. तसेच दिनकर मनवर यांनी दि.२० आॅक्टोबर रोजी व्यक्तिश: उपस्थित राहून आपले म्हणणे आयोगासमोर मांडण्याचे आदेश दिले आहेत.
औरंगाबाद येथील पत्रकार सुरेश पाटील यांनी समाज माध्यमावर महिलांविषयी अश्लील टिपणी केली असून, याची दखल घेत राज्य महिला आयोगाने पाटील यांनाही दि. २० आॅक्टोबर रोजी आयोगापुढे हजर राहावे, असे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी औरंगाबाद पोलिसांच्या सायबर सेल विभागास तात्काळ कारवाई करावी व त्याचा अहवाल आयोगास सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.