कचनेर येथे राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:53 IST2017-12-07T00:53:38+5:302017-12-07T00:53:57+5:30
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा हॉकी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कचनेर येथे ७ ते १0 डिसेंबदरम्यान राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कचनेर येथे राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा
औरंगाबाद : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा हॉकी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कचनेर येथे ७ ते १0 डिसेंबदरम्यान राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन माणिकचंद गंगवाल, सुरेशकुमार कासलीवाल, भरतकुमार ठोले, दिलीपकुमार काला, प्रवीणकुमार लोहाडे, हॉकी संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, सुनील पालवे, आझम सय्यद यांच्या उपस्थितीत होत आहे. या स्पर्धेत जवळपास ४00 स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उमेश बडवे, गोकुळ तांदळे, गुरुदीपसिंग संधू, कृष्णा केंद्रे, गणेश पवार, तनुजा गाढवे, सदानंद सवळे, सचिन बोर्डे, गणेश बेटुदे आदी परिश्रम घेत आहेत.