राज्य फुटसल स्पर्धेत देवगिरीला उपविजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:30 IST2017-11-29T23:30:14+5:302017-11-29T23:30:43+5:30
विभागीय क्रीडा संकुल येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय फुटसल स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाच्या मुलींनी औरंगाबादचे प्रतिनिधित्व करताना उपविजेतेपद पटकावले.

राज्य फुटसल स्पर्धेत देवगिरीला उपविजेतेपद
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुल येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय फुटसल स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाच्या मुलींनी औरंगाबादचे प्रतिनिधित्व करताना उपविजेतेपद पटकावले. या संघात यशश्री देशमुख, नाजेमा शहा, अंजुम शेख, शेख अरशी तब्बसुम यांचा समावेश होता. मुलांच्या संघात आर्यन बॅनर्जी, अजित पवार, लौकिक खंदारे यांचा समावेश होता. या कामगिरीबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आ. सतीश चव्हाण,स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य पंडितराव हर्षे, मोहनराव सावंत, त्रिंबकराव पाथ्रीकर, प्राचार्य शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य संभाजी कमानदार, रजनीकांत गरुड, प्रदीप सोळुंके यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंना प्रा. एकनाथ साळुंके,रणजित पवार, मंगल शिंदे, गणेश बेटुदे, शेख रफिक यांचे मार्गदर्शन लाभले.