शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

औरंगाबाद होतेय आणखी 'स्मार्ट'; रेल्वेस्टेशन परिसरात उभारणार अत्याधुनिक शहर बसस्थानक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 1:46 PM

New Busport in Railway Station Area of Aurangabad :त्याधुनिक बसस्थानक स्मार्ट सिटी बससेवेला पुरक ठरणार आहे.

ठळक मुद्देरेल्वेस्थानकांच्या मुख्य प्रवेशद्वार आणि एक्झिट गेटदरम्यान उभारण्यात येणार बसस्थानकया अत्याधुनिक बसस्थानकात केवळ बसगाड्यांनाच प्रवेश असणार आहे.

औरंगाबाद : रेल्वेस्टेशन परिसरात अत्याधुनिक शहर बसस्थानक उभारण्यात येणार आहे. प्रवासी पर्यटकांना आकर्षित करून त्यांना दर्जेदार सोयी-सुविधा पुरविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्याधुनिक बसस्थानकाच्या विकासासाठी स्मार्ट सिटीकडून निविदा काढण्यात आली आहे.

मनपाचे प्रशासक तथा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन लिमिटेडचे (एएससीडीसीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अत्याधुनिक बसस्थानक विकासासाठी कंत्राटदाराकडून निविदा मागविल्या आहेत. अत्याधुनिक बसस्थानक स्मार्ट सिटी बससेवेला पुरक ठरणार आहे. एएसडीसीएलच्या बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक प्रशांत भुसारी म्हणाले की, रेल्वेस्थानकांच्या मुख्य प्रवेशद्वार आणि एक्झिट गेटदरम्यान उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक बसस्थानकात केवळ बसगाड्यांनाच प्रवेश असणार आहे. इतर वाहनांना या परिसरात प्रवेशबंदी असणार आहे. बस नियंत्रणासाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. प्रवाशांसाठी पास काऊंटर, तक्रार निवारण कक्ष, सूचना व अभिप्राय केंद्र तसेच ऑडियो माध्यमातून बसेससंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. अत्याधुनिकरणात भिंतीचे बांधकाम, रंगरंगोटी, विविध कलाकृती, लँडस्केपींग तसेच रोषणाईंचा समावेश असणार आहे.

इतर वाहनांना प्रवेशबंदीअत्याधुनिक बसस्थानकाच्या प्रवेशास आरएफआयडी तंत्रज्ञानाने सुसज्ज स्वयंचलित बूम अडथळे बसविण्यात येणार आहे. याद्वारे केवळ स्मार्ट सिटीबस आतमध्ये प्रवेश करेल. दुचाकी, चारचाकी, रिक्षांना या परिसरात प्रवेशबंदी असणार आहे. रेल्वेस्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी, पर्यटकांना अत्याधुनिक बसस्थानक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत यापूर्वी रेल्वेस्थानक परिसरात तीन बसथांबे, दोन मेगा डिजिटल आऊटडोर डिस्प्ले आणि सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटी