महिला रुग्णालयासाठी जागेचे त्रांगडे सुरू

By Admin | Updated: August 22, 2014 00:18 IST2014-08-22T00:16:21+5:302014-08-22T00:18:59+5:30

औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयासोबतच शासनाने औरंगाबादच्या पदरात १०० खाटांचे महिला रुग्णालय टाकले. महिला रुग्णालय मंजूर झाल्यापासून जिल्हा शल्यचिकित्सकांनी जागेचा शोध सुरू केला.

Start of travel for women hospital | महिला रुग्णालयासाठी जागेचे त्रांगडे सुरू

महिला रुग्णालयासाठी जागेचे त्रांगडे सुरू

औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयासोबतच शासनाने औरंगाबादच्या पदरात १०० खाटांचे महिला रुग्णालय टाकले. महिला रुग्णालय मंजूर झाल्यापासून जिल्हा शल्यचिकित्सकांनी जागेचा शोध सुरू केला. प्रशासनाने त्यांना पडेगाव येथील जमीन देऊ केली. मात्र, तेथे मनपाचा पाणीपुरवठा नसल्याने तेथे रुग्णालय उभारण्यास त्यांनी नकार दिला. परिणामी जागेचे वांधे अजूनही कायम आहे.
जालना रोडवरील चिकलठाणा येथे सामान्य रुग्णालय उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा रुग्णालयासोबतच औरंगाबादेत स्वतंत्र स्त्री रुग्णालय व्हावे, अशी अनेक दिवसांची मागणी होती. ही मागणीही सहा महिन्यांपूर्वी मंजूर झाली.
शहरात १०० खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. स्त्री रुग्णालय मंजूर झाल्यानंतर जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. जी. एम. गायकवाड यांनी महसूल विभागाकडे जागेची मागणी
केली.
त्यासाठी विशेष पाठपुरावा केल्यानंतर महसूल विभागाने स्त्री रुग्णालयासाठी पडेगाव येथील गायरान जमीन दाखविली.
यावर डॉ. गायकवाड यांनी सांगितले की, कोणत्याही रुग्णालयास शुद्ध पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असते. पडेगाव येथे महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा होत नाही. तेथे आधीच नर्सिंग कॉलेज उभारण्याचे काम सुरू आहे.
नर्सिंग कॉलेजसाठीही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. त्यावर उपाय म्हणून आम्हाला टँकरने पाणी विकत घ्यावे लागणार आहे. मात्र, रुग्णालयासाठी खूप जास्त पाण्याची गरज भासते. ही बाब लक्षात घेऊन आम्ही पडेगाव येथील जागा नाकारली
आहे.
मनपा हद्दीत नवीन जागा मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे डॉ.गायकवाड यांनी सांगितले. विशेषत: टी. बी. हॉस्पिटलची जागा किंवा आमखास मैदान देण्याची विनंती आम्ही प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: Start of travel for women hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.