लिंकरोड चौफुलीवर वाहतूक सिग्नल सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 21:44 IST2019-05-14T21:44:06+5:302019-05-14T21:44:14+5:30

मुंबई-नागपूर महामार्गावरील लिंकरोड चौफुलीवरील वाहतूक सिग्नलच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले.

 Start the traffic signal on Linked Aup | लिंकरोड चौफुलीवर वाहतूक सिग्नल सुरु

लिंकरोड चौफुलीवर वाहतूक सिग्नल सुरु

वाळूज महानगर: मुंबई-नागपूर महामार्गावरील लिंकरोड चौफुलीवरील वाहतूक सिग्नलच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, सोमवारी सिग्नल सुरु झाल्यामुळे वाहनधारकांसह वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.


ए.एस.क्लब लगत असलेल्या लिंकरोड चौफुलीवरील वाहतूक सिग्नल महिनाभरापूर्वी बंद पडले होते. या सिग्नलवरील वायरिंग जळाल्याने सिग्नल नादुरुस्त झाले होते. त्यामुळे या रहदारीच्या चौकात वाहतुकीची सतत कोंडी होती. या सिग्नलच्या दुरुस्तीसाठी वाळूज वाहतूक शाखेचे निरीक्षक नाथा जाधव यांनी सिडको, रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे चार दिवसांपूर्वी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणतर्फे सिग्नल दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले. ते सोमवारी पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास सिग्नल सुरु झाले.

Web Title:  Start the traffic signal on Linked Aup