राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:12 IST2017-12-25T01:12:16+5:302017-12-25T01:12:36+5:30

विभागीय क्रीडा संकुल येथे रविवारी राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेस प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते झाले.

Start of the national rope-like tournament | राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेस प्रारंभ

राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेस प्रारंभ

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुल येथे रविवारी राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेस प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, भारतीय रस्सीखेच संघटनेच्या महासचिव माधवी पाटील, मदन मोहन, भीमराव शेरे, राज्य संघटनेचे सचिव जनार्दन गुपिले, फकिरराव घोडे, विलास चंदन, राकेश खैरनार, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, गोकुळ तांदळे, प्रदीप बोरसे, अर्जुनसिंग भावना शर्मा आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे निकाल ३८० किलो (सबज्युनिअर - १३ वर्षांखालील) : केरळ विजयी वि. तेलंगणा (३-०), १५ वर्षांखालील (४४० किलो) : दिल्ली विजयी वि. पंजाब (३-०), तेलंगणा वि. वि. पंजाब (३-०). १७ वर्षांखालील (४८० किलो) : पंजाब वि. वि. दिल्ली (३-०), केरळ विजयी वि. तेलंगणा (३-०).

Web Title: Start of the national rope-like tournament