औरंगाबादेत मत्स्यपालन पदविका महाविद्यालय सुरू करा (वाणिज्य वार्ता)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:04 IST2021-04-09T04:04:26+5:302021-04-09T04:04:26+5:30
फुलंब्री : औरंगाबाद जिल्ह्यात मत्स्यपालन व व्यवसाय पदविका महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ ...

औरंगाबादेत मत्स्यपालन पदविका महाविद्यालय सुरू करा (वाणिज्य वार्ता)
फुलंब्री : औरंगाबाद जिल्ह्यात मत्स्यपालन व व्यवसाय पदविका महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरच्या सदस्या अनुराधा चव्हाण यांनी गुरुवारी विद्यापीठाच्या ऑनलाईन बैठकीत केली.
नागपूर येथील पशू व विज्ञान विद्यापीठाच्या संचालक व सदस्याची गुरुवारी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत चव्हाण यांनी सहभाग घेतला. औरंगाबाद जिल्ह्यात सार्वजनिक २१ हजार शेततळी आहेत. या शेततळ्यांत चांगल्या प्रकारे मत्स्यपालन केले जाऊ शकते. तसेच तरुणांना यातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. याकरिता तरुणांना मार्गदर्शन व प्रशिक्षणाची गरज आहे. तसेच विद्यापीठाच्या वतीने यंदा गोड पाण्यातील मत्स्यपालन व व्यवस्थापन हे दोन वर्षीय पदविका अभ्यासक्रम नव्याने सुरू केले जाणार आहेत. म्हणून, औरंगाबाद जिल्ह्यात मत्स्यपालन व व्यवस्थापन पदविका महाविद्यालय सुरू करण्याची गरज अनुराधा चव्हाण यांनी ऑनलाईन बैठकीत मांडली. औरंगाबाद जिल्ह्यातून नागपूर मत्स्य विज्ञान विद्यापीठावर सदस्य म्हणून चव्हाण या पहिल्या महिला सदस्या आहेत.
फोटो :
080421\anuradha chavan_1.jpg
अनुराधा चव्हाण