आंबेडकरी साहित्य संमेलनास आज प्रारंभ

By Admin | Updated: April 9, 2015 00:12 IST2015-04-09T00:06:36+5:302015-04-09T00:12:39+5:30

कळंब : येथील राजर्षि शाहू साहित्यनगरीमध्ये ९ व १० एप्रिल रोजी राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

Start of the Ambedkarite Literary Meet today | आंबेडकरी साहित्य संमेलनास आज प्रारंभ

आंबेडकरी साहित्य संमेलनास आज प्रारंभ


कळंब : येथील राजर्षि शाहू साहित्यनगरीमध्ये ९ व १० एप्रिल रोजी राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
गुरुवार दि. ९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता फ.मु. शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांच्यासह आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, डॉ. श्रीपाल सबनीस, प्राचार्य डॉ. अशोक मोहेकर आदींची उपस्थिती राहणार आहे. दुपारी साडेबारा वाजता ‘वर्तमान शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महात्मा फुले, छत्रपती शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर परिसंवाद होणार आहेत. यामध्ये माजी आमदार पाशा पटेल (लातूर), अमर हबीब (अंबेजोगाई), डॉ. विठ्ठल मोेरे (लातूर), प्रा. भास्कर चंदनशिव (कळंब), डॉ. ऋषिकेश कांबळे (औरंगाबाद) आणि बसवंत उबाळे हे सहभागी होणार आहेत. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रल्हाद लुलेकर (औरंगाबाद) असणार आहेत. दुपारी अडीच वाजता ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली ‘कथाकथन’ होणार असून, यामध्ये के. व्ही. सरवदे, विलास सिंदगीकर, अ‍ॅड. वा. मा. वाघमारे, एकनाथ सोनवणे, टी. एल. कांबळे, रवीचंद्र हडसंगकर, प्रा. अनिता एलमंटे, प्रा. अर्जुन व्हटकर आदी सहभागी होणार आहेत. रात्री ८ वाजता ‘भीम निळाईच्या पार’ या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी १० रोजी सकाळी १०.३० वाजता ‘दलितांच्या सांस्कृतिक आणि राजकीय चळवळी थांबल्या आहेत’ या विषयावर डॉ. कृष्णा किरवले (कोल्हापूर) यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. यात माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे (मंगळवेढा), प्रा. रामनाथ चव्हाण (पुणे), डॉ. कमलाकर कांबळे (माजलगाव), डॉ. सुरेश वाघमारे, प्रा. सुधीर अनवले (लातूर), डॉ. अनंत राऊत (नांदेड) आणि विशाल सोनटक्के (उस्मानाबाद) सहभागी होणार आहेत.
दुपारी दीड वाजता डी. व्ही. जगत्पुरीया यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन रंगणार असून, यामध्ये मराठवाड्याच्या विविध भागातील नामवंत कवींचा सहभाग असणार आहे. संमेलनाची जय्यत तयारी झाली असून, विविध भागातील साहित्यीक कळंबमध्ये दाखल होत असल्याचे स्वागताध्यक्ष डॉ. संजय कांबळे यांनी सांगितले. (वार्ताहर)
१० एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता ‘चळवळीतील ज्येष्ठांसह नामांतर लढ्यात जेल भोगलेल्या कार्यकर्त्यांचा यशपाल सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात येणार असून, यावेळी आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, उत्तम कांबळे, डॉ. गंगाधर पानतावणे, खा. रवींद्र गायकवाड, आ. विक्रम काळे, चेतन ंिशंदे, अनंत आडसूळ, अनंत चोंदे, प्रा. अर्जुन जाधव आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Web Title: Start of the Ambedkarite Literary Meet today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.