जवानाला मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यासाठी ठाण्यासमोर ठिय्य्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:04 IST2021-07-16T04:04:37+5:302021-07-16T04:04:37+5:30
सावखेडगंगा येथे सैन्य दलातील जवान गोविंद पवार यांच्यावर जमिनीच्या जुन्या वादातून काठी व कुऱ्हाडीने दोन दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला ...

जवानाला मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यासाठी ठाण्यासमोर ठिय्य्या
सावखेडगंगा येथे सैन्य दलातील जवान गोविंद पवार यांच्यावर जमिनीच्या जुन्या वादातून काठी व कुऱ्हाडीने दोन दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात जवान पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छावणी येथील मिलिट्री दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणात आरोपींना पाठीशी घालत असून फिर्यादीलाच आत टाकण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप त्रिदल सैनिक संघ व जवानाची पत्नी रुपाली पवार यांनी केला आहे. यामुळे रुपाली पवार यांनी दोन तास पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. त्रिदल सैनिक संघाकडूनही ठाण्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांची चौकशी व्हावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
फोटो : जवानाला मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यासाठी ठाण्यासमोर आंदोलन करताना त्रिदल सैनिक सेवा संघाचे कार्यकर्ते व जखमी जवानाची पत्नी.
140721\320714_2_abd_145_14072021_1.jpg
जवानाला मारहाण करणारांना अ टक करण्यासाठी ठाण्यासमोर आंदोलन करताना त्रिदल सैनिक सेवा संघाचे कार्यकर्ते व जखमी जवानाची पत्नी.